[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाची बैठक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाची बैठक

येत्या सोमवार दि.13/02/2023 रोजी दु. 12.00 वा. चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चांदवड येथील रेस्ट हाऊसमध्ये घेण्यात येणार आहे. सदर बैठकीस अध्यक्ष म्हणुन मा.आ.श्रीशिरिषभाऊ कोतवाल हे असुन बैठकीत कांदा, द्राक्ष व शेतमालाचे बाजारभाव दैनंदिन घसरत असल्याने शेतकरी बांधवांचे प्रतिनिधीत्व म्हणुन यावर आंदोलन करणेबाबत विचार विनिमय करणे हा प्रमुख विषय घेण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत लाल कांद्याचे बाजारभावात दैनंदिन घसरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतक-यांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच शेतक-यांवर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे. परंतु केंद्र शासन व राज्य शासन याकडे जाणीवपुर्वक डोळे बंद करुन कांदा उत्पादक शेतक-यांसाठी कोणतीही ठोस पाऊले उचलत नसल्याचे दिसत आहे. त्याकरीता आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्याकरीता कॉंग्रेस पक्षातर्फे या बैठकीचे आयोजन केलेले असुन बैठकीस सर्व तालुका कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.संजय दगुजी जाधव, तालुकाध्यक्ष- काँग्रेस पक्ष चांदवड, संपतराव वक्ते, नाशिक जिल्हा किसान सेल अध्यक्ष , श्री.समाधान जामदार, कार्याध्यक्ष- काँग्रेस पक्ष चांदवड, यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या