दरेगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची डॉ. राहुल आहेर यांच्याकडे विविध विकास कामासंदर्भात मंजुरीसाठी मागणी
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील ग्रामपंचायतिचे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने तालुक्याचे आमदार डॉ.राहुलदादा आहेर यांची भेट घेऊन गावातील विविध समस्या गावातील विविध विविध विकास कामासंदर्भात मंजुरीसाठी मागणी केली. दरेगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या योजनेत अंदाजपत्रकात पाण्याच्या साठवण टाकीचा समावेश नाही . सदर योजनेत पाण्याची टाकी समाविष्ट करावी , अशी मागणी केली. तसेच सदर योजना झाली तरी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता पुरेशी राहणार नाही .त्यामुळे ओझेरखेड 44 गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी कोकण खेड्यापर्यंत आले आहे ते दरेगाव येथील नियोजित जलजीवन मिशनच्या योजनेस जोडून सदर पाणी गावात उपलब्ध करून द्यावे , अशी मागणी करण्यात आली. गावठाण ते कानिफनाथ मंदिर हा रस्ता सुधारणा करणे तसेच गावठाण ते वाघाड वस्ती रस्ता सुधारणा करणे , गावांतर्गत काँक्रिट रस्ता तयार करणे , दरेगाव येथील तलाठी कार्यालयास नवीन इमारत बांधकाम करणे ,समाज कल्याण विभागामार्फत सांस्कृतिक भवन सामाजिक सभागृह मंजूर करणे ,दरेगाव येथील स्मशानभूमी परिसरात जनसुविधा योजनेअंतर्गत पूर्व बाजूने संरक्षण भिंत व लाईटची व्यवस्था करणे , दरेगाव विद्युत सब स्टेशनचे काम लवकर सुरू करणे , रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक बसवणे ,प्राथमिक शाळेत किचनसेड साठी नवीन इमारत उपलब्ध करून देणे , इत्यादी मागण्या आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे करण्यात आल्या .सदर मागण्यांना डॉ. आहेर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दरेगाव येथे नवीन तलाठी कार्यालय ,कानिफनाथ रस्ता व स्मशानभूमी परिसर सुधारणा , जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी इत्यादी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व इतर कामेही लवकरात लवकर मंजूर करू ,असे शिस्टमंडळाला सांगितले. यावेळी दरेगाव येथील सरपंच जालिंदर सरला पवार ,ग्रामपंचायत सदस्य संजय दामू जाधव, वैशाली विक्रम देवरे ,माजी सरपंच नथू देवरे ,माजी सोसायटी चेअरमन बबनराव गांगुर्डे ,माजी चेअरमन भाऊसाहेब देवरे ,संचालक संजय गांगुर्डे , विक्रम देवरे , एड. समाधान गव्हाणे ,विक्रम गांगुर्डे , दत्तू पगार , जालिंदर पवार यांच्यासह ग्रामस्थ यांनी मागणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम बाबा मार्कंड , डॉ.भाऊराव देवरे , शिंगवे येथील सरपंच आत्माराम खताळ , डोणगाव येथील सरपंच गोकुळ वाघ , डोणगाव उपसरपंच संदीप जेजुरे, किरण बोरसे आदी उपस्थित होते.

