पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला अखेर समाजसेवक भागवत झाल्टे यांच्या मुळेच मिळाले कुत्र्याला जीवदान
बाळू पुंजा गोजरे यांच्या शेतालगत असणाऱ्या 6 परस विहीरीत 30/07/23 रोजी रात्रीच्या सुमारास कोरड्या विहिरीत पडला कुत्रा त्याचा आवाज बाहेर येऊ लागला त्यावेळेस बाळू पुंजा गोजरे हे त्या ठिकाणी गेले त्याला काढण्यासाठी बरेच प्रयत्न करून बघितले पण अपयश ठरले परिसरात चर्चा होऊ लागली त्यात काही स्थानिकांनी भागवत झाल्टे यांना बाळू पुंजां गोजरे यांनी कॉल केला झाल्टे यांनीं प्रत्यक्षात तात्काळ भेट दिली व कुत्र्याला बिस्किट व भाकरी टाकल्या व वीहीर जुनाट व आवघड असल्यामुळे काढण्यासाठी मुश्किल होते
झाल्टे यांनी वन वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे साहेब येवला यांच्याशीं संपर्क साधला व तात्काळ वन विभागाच्या कर्मचारी वनरक्षक मॅडम सोनाली वाघ वनरक्षक मॅडम वंदना खरात वन कर्मचारी अंकुश गुंजाळ संजय गुंजाळ हजार झाले व कुत्रा काढण्यासाठी रेस्क्यू काम चालू झाले बऱ्याच प्रयत्नानंतर कुत्रा काढण्यासाठी पावणे दोन तासाचा कालावधी लागला वन कर्मचारी वडगांव कर व समाजसेवक भागवत झाल्टे वन कर्मचारी यांच्या प्रयत्नाने कुत्रा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले त्यावेळी वडगांव पंगु चे पोलीस पाटील सागर पवार वाल्मीक मुरलीधर गोजरे बाळू पूंजा गोजरे शंकर झाल्टे व स्थानिक शेतकरी उपस्थित होते
समाजसेवक भागवत झाल्टे यांनी 2023 मध्ये चांदवड तालुका नांदगाव तालुका मनमाड व येवला तालुका परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दिले नऊ ठिकाणी मुक्या प्राण्यांना जीवदान
एक CRP पोलीसाचा जीव वाचवाला
तीन हरणानां जीवदान दिले
दोन कोल्हेनां जीवदान दिले
एक मोर व एक राणपिंगळ (गुबड)
दोन कुत्रे
दोन सर्प
निस्वार्थ पणे पुर्ण मदत केली त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक म्हणून संपूर्ण परिसरात श्री भागवत झाल्टे यांना ओळखले जाते

