आम्हीही माणसेच आहोत ना..
विविध समस्यांनी त्रस्त डावखरनगर मधील महीलावर्गाचा चांदवड नगरपरिषदेला सवाल
डावखरनगर मधील महिला वर्ग व जेष्ठ नागरिकांची समस्या चांदवड शहारातील सर्वात प्रथम उदयाला आलेली पहिली डावखरनगर कॉलनी आज विविध समस्यांनी त्रस्त झालेली आहे.कॉलनीतील श्री बिडगर हयाच्या घरापासून ते श्री काळे (गिरणी) पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून चांगला रस्ता नाही .नगरपरिषदने चोवीस तास पाणी योजनेखाली रस्ता खोदून ठेवला पण अदयापही तो चांगला करण्यांस नगरपरिषदेला वेळ नाही सदर रस्तायावर जागोजागी मोठे खडे तयार झाले आहे पावसाच्या पाण्यामुळे त्यात पाणी साचल्यामुळे जाण या येणा-या वाहतुकीमुळे शाळकरी मुले-मुलींना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रस्ता इतका खराब झाला आहे की आपण एखादया ग्रामीण भागातील वाड्यावर रहातो असे वाटते कॉलनीतील माहिला व नागरिकांना पायी चालणे अवघड होऊन बसले आहे. कॉलनीतील गटारीची अवस्था त्याहून वाईट आहे जागोजागी गवत वाढले आहे चिखल तयार झाला आहे त्यामुळे रोगराई ला आमंत्रण देण्यासारखे आहे हयाची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. पण नगरपरिषदचे अधिकारी यांना या कडे पाहण्यांस वेळ नाही. त्याकडे लक्ष देत नाही .अनेक भटकी कुत्री जनावरे रस्ताने फिरतात त्यामुळे नागरिक भयभीत होतात साफसफाई साठी कोणीही लक्ष देत नाही.

तरी नगरपरिषदेने वरील रोड बाबत लवकर निर्णय घ्यावा असे येथील महिला नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा येथील रहिवासी नगरपरिषदेतील महिला नगरपरिषदेतील संबधित अधिकारी वर्गाला घेराव घालतील.
सौ. संगिता शेळके, सौ भाग्यश्री ढवण, सौ मनिषा शेळके सौ कल्पना शेळके, सौ दिपाली वाळुंज ,सौ सुवर्णा गांगुर्डे, सौ सुशिलाबाई बिडगर, सौ शीतल शिंदे, सौ देवरे, सौ हांडगे, सौ. सुशिला नारायण शेळके, सौ सिमा राजेंद्र काळे, सौ बिजलाबाई वाळुंज, सौ. भीमाबाई गांगुर्डे, सौ. सुरेखा नंदकुमार कोतवाल व नागरिकांनी केले आहे.




