‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्यावतीने ‘चांदवड तालुका विकास परिषदे’ चे सप्टेंबर मध्ये
भव्य आयोजन.
—————————————-
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या
चांदवड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आज संपन्न.
—————————————-
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्यावतीने सप्टेंबर 2023 महिन्याच्या पहिल्या आठवडयात भव्य स्वरूपात ‘चांदवड तालुका विकास परिषद’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
‘चांदवड तालुका विकास परिषदे’ च्या अचूक व अभ्यासपूर्ण नियोजनासाठी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या चांदवड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आज रविवार,दि.13 ऑगस्ट 23 रोजी, दुपारी ठीक 04.00 वाजता,रेणुका लॉन्स,मंगरूळ, ता.चांदवड,
जि.नाशिक येथे आयोजित करण्यात आली.
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, सहसमन्वयक
श्री.प्रकाशराव महाले, नाशिक विभाग अध्यक्ष श्री.संजय भांबर,चांदवड तालुका अध्यक्ष श्री.विजय जाधव,चांदवड तालुका समन्वयक श्री.अनिल काळे,चांदवड तालुका महिला समन्वयक सौ.अर्चनाताई पूरकर व चांदवड तालुका महिला संघटक सौ.गीताताई झाल्टे यांनी पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत विचाविनिमय करून विकास परिषदेचे निश्चित नियोजन ठरवले.
‘चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती’ चे नवनिर्वाचित सभापती श्री.संजयजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित श्री.योगेशजी ढोमसे,श्री.गणेशजी निंबाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.कोंडाजीअण्णा पाटील, श्री.उत्तमराव ठोंबरे हे यावेळी उपस्थित होते
चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी यांच्या सर्वांगीण प्रबोधनासाठी ‘चांदवड तालुका विकास परिषद’ आयोजित करण्यात येत आहे.
‘चांदवड तालुका विकास परिषदे’ त प्रामुख्याने –
1.कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत म्हणून केंद्रशासनाने अग्रक्रमाने पुरस्कृत केलेली इंधनासाठीची बांबू शेती.
2.कांदाशेती स्थिर स्वरूपात आर्थिक दृष्ट्या किफायतशीर व्हावी यासाठी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाशी अभ्यासपूर्ण संवाद – समन्वय करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना व कार्यवाही.
3. शासकीय सहकार्याने ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिक स्वरूपात सौर ऊर्जा निर्मिती – सौरग्राम प्रकल्प.
4. उद्योग जगताच्या सी.एस.आर. निधीतून ग्रामस्तरावर पाणी संवर्धन प्रकल्प निर्मिती.
5.विविध स्तरावरील प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत संवाद – समन्वय उपक्रम.
हे विषय प्रामुख्याने विचारात घेण्यात येणार असून त्याविषयी सर्वांगीण प्रबोधन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील तज्ञ मान्यवरांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.
‘चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती’ च्या चेअरमन पदी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे हितचिंतक स्नेही, चांदवड तालुक्यातील नेते – कार्यकर्ते असणारे श्री.संजयराव जाधव यांची तर संचालकपदी श्री.योगेशजी ढोमसे व श्री.गणेशजी निंबाळकर यांची नुकतीच निवड झाली. तसेच ‘चांदवड तालुका खरेदी – विक्री सहकारी संघा’च्या संचालक पदी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे तालुका समन्वयक व चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अनिलराव काळे,सामाजिक कार्यकर्ते श्री.रवींद्रजी शिंदे व श्री.विक्रमजी देवरे यांची नुकतीच निवड झाली.या सन्माननीय निवडीबद्दल यावेळी या मान्यवर स्नेह्यांचा ‘सरपंच संसदे’ च्या वतीने सत्कार करून त्यांना सानंद – साभिमान शुभेच्छा देण्यात आल्या.
बैठकीसाठी ‘रेणुका लॉन्स’ चे सभागृह व इतर व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉन्सचे संचालक श्री.अजय पुंजाराम जाधव यांचा विशेष सत्कार करून त्यांना धन्यवाद देण्यात आले.
श्री.विजय जाधव यांनी बैठकीचे प्रास्ताविक सादर केले. प्रारंभी श्री.अनिल काळे यांनी सर्वांचे स्वागत केले व बैठकीच्या शेवटी आभार मानले.श्री.संजय भांबर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले.
श्री.संजय जाधव, श्री.गणेश निंबाळकर, सौ.अर्चनाताई पूरकर, सौ.गीताताई झाल्टे यांनी मनोगते व्यक्त केली.