यावल महाविद्यालयात ध्वजारोहण व इतर कार्यक्रम संपन्न.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला ध्वजारोहणाचा मान संस्थेचे संचालक श्री. वसंतराव भोसले यांना मिळाला. यावेळी संस्थेचे संचालक श्री. सुनील भोईटे, डॉ.हेमंत येवले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात तिरंगा रॅली व पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. प्रारंभी कु. संध्या कोळी ह्या विद्यार्थिनीचे देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. वसंतराव भोसले यांनी पालक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे यावल महाविद्यालय हे वंचित,पीडित, गोरगरीब , आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे खुले व्यासपीठ बनले आहे. 15 ऑगस्ट 19 83 रोजी महाविद्यालयाची स्थापना झाली त्याला आज 40 वर्षे पूर्ण होत आहेत महाविद्यालयातून बरेच विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च दर्जाच्या नोकऱ्या व व्यवसायामध्ये काम करीत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून भारत देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती देऊन बलिदान केले त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या वाढत आहे. सर्वसामान्य शेतकरी बांधवांची मुलं शिक्षण घेऊन शिस्तीचे धडे घेत आहेत. शिक्षण हे सर्व बदलाचे प्रभावी माध्यम असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवणे हे महाविद्यालयाचे आद्य कर्तव्य आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. आर. डी. पवार डॉ. सुधीर कापडे डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. राजू तडवी, प्रा.मयुर सोनवणे, प्रा. संजिव कदम, प्रा. एकनाथ सावकार उपस्थित होते. प्रा. अनिल पाटील, प्रा. सुभाष कामडी, प्रा. नरेंद्र पाटील प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. सी. टी. वसावे, प्रा. नंदकुमार बोदडे, प्रा. प्रेरणा इंगळे, प्रा. पी. व्ही. रावते, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अमृत पाटील, प्रमोद जोहरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालकही उपस्थित होते.

