[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मेसनखेडे बु येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मेसनखेडे बु येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मेसनखेडे बु॥ ता. चांदवड येथे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला मेसनखेडे बु येथील जि.प शाळेचे ध्वजारोहन मेसनखेडे चे भुमीपुत्र तसेच ह.मु. मुंबई येथील उद्योजक श्री भाऊसाहेब पगारे यांच्या हास्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच ध्वजाचे ध्वजपुजन शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष श्री आण्णा क-हे, उपाध्यक्ष श्री शरद थोरात, यांच्या हास्ते करण्यात आले.आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन श्री भाऊसाहेब पगारे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी भेट दिली त्या टाकीचे उद्घाटन माजी उपसरपंच श्री छबु क-हे व पो.पाटील सौ मथुरा क-हे यांच्या हास्ते करण्यात आले तसेच ग्रुप ग्रामपंचायत मेसनखेडे खु॥ यांच्या तर्फे शाळेसाठी 1ऑफीस टेबल,5 खुच्र्या,1 साऊंड सिस्टिम शाळेला भेट देण्यात आले,या प्रसंगी शाळेतील मुलांनी अतीषय चांगल्या प्रकारे सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले यावेळी श्री गंगाधर बिडगर व श्री स्वराज कऱ्हे यांची भाषणे झाली शाळेचे मुख्यध्यापक श्री सोनवणे सर, श्री खैरे सर यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु प्रणीती खैर हिने केले.यावेळी गावातील सर्व नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते नास्टा व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या