[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न. बैठकीत ना.पवार व ना. भुजबळ साहेबांच्या मागे ताकद उभी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर माजी आमदार उत्तम बाबा भालेराव व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड या मातब्बर नेत्यांनी शरद पवार गटाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा पवार यांच्या गटाकडे किती कार्यकर्ते जातील याची तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता होती. त्या दृष्टीने अजितदादा पवार गटाची पहिलीच बैठक असल्याने या बैठकीस कोण कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागून होते .या बैठकीस चांदवड -देवळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खंडेराव आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथअण्णा आहेर , माजी सभापती अनिल काळे, सुनीलतात्या कबाडे , बाकेराव जाधव ,यु .के . आहेर, आर.डी. थोरात, बाळासाहेब मावळे, महेश देशमाने, रेवण ठाकरे, सतिश सोनवणे, अरुण निकम आदींनी अजितदादा पवार यांच्या गटाच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न. बैठकीत ना.पवार व ना. भुजबळ साहेबांच्या मागे ताकद उभी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून ही साधे कार्यकर्तेच पक्षाबरोबर आहे लोकांचा विश्वास आहे तेच लोक पक्षाबरोबर आहे नेते नसले तरी कार्यकर्त्यांचा मोठा संच आगामी काळात पक्षाची ताकद उभी करणार आहे हे अभूतपूर्व असून अभूतपूर्व शब्दात अजित, भुजबळ ,तटकरे या नावांचा समावेश असल्याने दूरदृष्टी असलेल्या या नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची मोठी संधी पक्षातील कार्यकर्त्यांना मिळणार आहे राष्ट्रवादीसाठी चांदवड तालुक्याईतका चांगला तालुका नाही एका दिवसात 51 शाखा उघडण्याचा विक्रम याच चांदवड तालुक्याने केला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भुजबळ साहेबांच्या प्रयत्नामुळे रेणुका माता मंदिर चंद्रेश्वर मंदिराचा विकास झालेला आहे. तालुक्यातील शेती, पाणी व इतर सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाप्रमुख एडवोकेट रवींद्रनाना पगार यांनी चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळेस प्रमुख उपस्थिती समता परिषदेचे दिलीपअण्णा खैरे यांची होती. सभेचे सूत्रसंचालन माजी सभापती यु. के. आहेर यांनी केले .

मेळाव्यात मार्गदर्शन करताना रघुनाथ मोहन आहेर

यावेळेस अनिल काळे, रेवनभाऊ ठाकरे, सुनीलतात्या कबाडे ,आर.डी. थोरात ,रघुनाथअण्णा आहेर, डॉक्टर योगेश गोसावी, खंडेराव आहेर, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, डॉ. श्याम पगार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, माजी सभापती अनिल काळे, समता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.यशवंत शिरसाठ, राजेंद्र जाधव विजय पवार ,किशोर पिंपळे ,बाकेराव जाधव, डॉक्टर अरुण निकम, रामभाऊ मोरे , महेश देशमाने आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खंडेराव आहेर

कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन एडवोकेट राजेंद्र ठाकरे,खंडेराव आहेर, रघुनाथ आण्णा आहेर,आर.डी. थोरात, अनिल काळे, सुनिल कबाडे,यु.के.आहेर,बाकेराव जाधव,सतिष सोनवणे, नंदकुमार मंडलिक, बाळासाहेब मावळे,किशोर शेलार,उत्तम कोल्हे, राजाराम देवरे,बाळु आहेर, भाऊसाहेब जाधव,आण्णा खैरे, राजेंद्र ठाकरे, ज्ञानेश्वर पगार,दशरथ ठाकरे,वसंत सोनवणे, एकनाथ सोनवणे, मधुकर गोसावी,केशव खैरे, सुधाकर शेलार, भगवान मंडलिक, दिपक खेरे, रघुनाथ ठोबरे , केलास पगार, भाऊसाहेब गांगुर्डे, शांताराम गांगुर्डे, शेखर निमशे, जनार्दन खैरनार, कैलास पगार, दादाजी अहिरे, शांताराम शेलार,भारत आहेर,दिपक खैरे,अमोल खैरे, भाऊसाहेब गांगुर्डे, शशिकांत गांगुर्डे,नेवा वाघ,संजय खैरे, संतोष एळिंजे, वाल्मिक पगार, दत्तु पगार,विश्वनाथ वाघचौरे, योगेश रौंदळ, शशिकांत आहेर, शांताराम गांगुर्डे, गोकुळ देवरे,किरण आहेर, हर्षद काळे, सुरेश गांगुर्डे, रूपम कोतवाल,पंकज घुले, वैभव आहेर, अमोल शेलार,राहुल गांगुर्डे, ऋषिकेश पेंढारी, सुजित बाराहाते, ऋषिकेश बोराडे, संदिप पवार,, देविदासशेठ सोनवणे, नाना गोडबोले पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या