[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ‘चांदवड तालुकाध्यक्ष’ या पदावर रघुनाथ आहेर यांची निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ‘चांदवड तालुकाध्यक्ष’ या पदावर रघुनाथ आहेर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत मा. अजित दादा पवार व छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आशीर्वादाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत एकनिष्ठतेने केलेल्या कामाची पावती म्हणून आज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली


यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई येथे नियुक्ती पत्र स्वीकारले असुन याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.खा सुनिल तटकरे साहेब, मा.खा.समीरभाऊ भुजबळ जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप आण्णा खैरे, पुणे शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर आर.डि.थोरात,अनिलजी काळे, सुनिल तात्या कबाडे यु.के.आहेर सर,बाकेराव जाधव,बाळासाहेब मावळे,गोकुळ देवरे, भाऊसाहेब जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.आपण राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना. अजितदादा पवार साहेब, मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे साहेब यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी परिश्रम घ्याल असा विश्वास जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार यांनी व्यक्त केला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या