[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका कॉग्रेस कार्यकर्ते नागपुरला जाणार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका कॉग्रेस कार्यकर्ते नागपुरला जाणार

चांदवड तालुका काँग्रेस पक्षाची बैठक मा. आ. शिरिषकुमार कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते, दि.२८ डिसेंबर रोजी कॉग्रेस पक्षाला १३८ वर्ष पूर्ण झाले असून या दिवशी काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात काँग्रेस पक्षाची भव्य रॅली आयोजित केलेली आहे. राज्यभरातील १० लाख काँग्रेस कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी,काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी,माजी काँग्रेस अध्यक्ष मा.खा.राहुलजी गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार आहे.त्यादृष्टीने नियोजनासाठी नियोजनासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत सर्व कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने नागपुरला जाणार असल्याचे एकमताने होकार दिला, तसेच कॉग्रेस पक्ष आर्थिक अडचणीत आलेला असल्याने पक्षाला निधी जमा करण्यासाठी तालुक्यामधुन रु.१३८/- प्रमाणे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रु.१३८/- च्या पटीमध्ये कॉग्रेस पक्षासाठी निधी जमा करण्याचे व नागपुर येथील महारॅलीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिरिषकुमार कोतवाल व तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी केले आहे.यावेळी काका रकिबे, मधुकर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव, रंजन जाधव, केदारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीस शिरिषकुमार कोतवाल, संजय जाधव, समाधान जामदार, उत्तमराव ठोंबरे, संपतराव वक्टे, राहुल कोतवाल, नंद भागवत कोतवाल, अॅड. अन्वर पठाण, प्रा, निरंजन जाधव, दिपांशु जाधव, जाहीद घांसी, ज्ञानेश्वर जाधव, सुभाषराव जाधव, नंदकुमार रघुनाथ कोतवाल, भाऊसाहेब शेलार, राजेंद्र साठे, राजेंद्र ठोंबरे, भिमराव जेजुरे, शंकर थोरात, संतोष पवार, साहेबराव चव्हाण, शंकरराव शिरसाठ, सर्जेराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, मंगेश दरेकर, संजय कोल्हे, मोहन शिंदे, सचिन कोतवाल, दत्तु कोतवाल, कैलास सावकार, परशराम केदारे, ॲड.भरत ठाकरे, काका रकिबे, मधुकर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव, रंजन जाधव, केदारे सर आदी सह मोठ्याप्रमाणात कार्यकते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या