[masterslider id="2"]
मुख्य बातमी

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा निमगव्हान ता.चांदवड उत्साहात शुभारंभ…

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा निमगव्हान ता.चांदवड उत्साहात शुभारंभ…

२५८९ माता-भगिनींना अर्जांचे वाटप करून १२७८ माता-भगिनींचे अर्ज भरले

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा चांदवड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छापूर्ती लॉन्स, निमगव्हाण ता.चांदवड येथे आज शुभारंभ करण्यात आला. मोठ्या उत्साहात शुभारंभाचा हा कार्यक्रम पार पडला. या शुभारंभ कार्यक्रमासाठी वाहेगावसाळ गणातील हजारो माता-भगिनी उपस्थित होत्या. या सर्व माता व भगिनींना जागेवरच या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी चांदवड तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे तहसील व पंचायत समिती कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले. अनेक आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माता-भगिनींना आवश्यक सरकारी कागदपत्रे देणे व त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम केले. त्यामुळे वाहेगावसाळ गणातील माता-भगिनींना खूप मोठी मदत झाली. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी चांदवड तालुक्याच्या वतीने मी आभार मानले.

याशिवाय चांदवड- देवळा मतदार संघात महिल्याभरात गण निहाय अभियान राबविले जाणार आहे. तसेच या योजनेचा प्रत्येल महिलेला कसा लाभ होईल याची काळजी संबंधित विभागाने घ्यावे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांनीही मोठ्या मोठ्या प्रमाणात अर्ज भारावून घेतलेले आहे त्याचबरोबर त्यांचा मोठा फायदा होत आहे गावातील प्रत्येक महिले पर्यंत पोहचून योजनेचा अर्ज भरून घेत आहेत त्यांचे टार्गेट पूर्ण करत अश्या ही अंगणवाडी सेविकांचे कौतुक करावे ते कमी आहे. तसेच लाडकी बहीण योजने प्रमाणे तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असून यातही याच पद्धतीने काटेकोर पणे नियोजन करून जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आपल्या भाषणात आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी सांगितले.

भाजपचे सर्व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात माता-भगिनींना कोणतीही अडचण येणार नाही याची मनापासून काळजी घेतली.

दुसऱ्या दिवशी २५८९ माता-भगिनींना योजनेच्या अर्जांचे वाटप करून १२७८ माता-भगिनींचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले. इतर अर्ज ही ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंचांनी आपल्या आपल्या गावातील महिलांचे १००% अर्ज भरून घेण्यात यावे असे आवाहन कार्यकर्ते यांना केले तसेच पुढील मंगळवार दि.२३ जुलै २०२४ रोजी धोडंबे येथील येथे अभियान होणार आहे. अभियानास जास्तीत जास्त महिलांना उपस्थित राहुल आपले अर्ज भरण्याची आवाहन ही आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी केले आहे.

डॉ.नितीन गांगुर्डे, नायब तहसीलदार श्री.खेडकर, श्री.बाळासाहेब माळी, श्री.बाळासाहेब वाघ, श्री.पंढरीनाथ खताळ, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, श्री.शांताराम भवर, श्री.देविदास आहेर, श्री.विजय धाकराव, श्री.गणपत ठाकरे, श्री.केशव खैरे, श्री.दीपक भोयटे, श्री.अरुण देवढे, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.पिंटू भोईटे, श्री.कैलास पवार, श्री.बबन दरेकर, श्री.अमर मापारी श्री.देविदास आहेर, श्री.साईनाथ कोल्हे, श्रीमाती.गीताताई झालटे तसेच आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, पंचायत समिती अधिकार, कर्मचारी व वाहेगावसाळ गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या