*नाशिक जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल यांचा बुधवारी अभिष्टचिंतन सोहळा. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा*

चांदवड देवळा विधानसभेचे माजी आमदार नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल यांचा बुधवार दिनांक २४ जुलै रोजी सकाळी दहा वाजता चांदवड येथील रेणुका लॉन्स येथे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे. तसेच यावेळेस महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर शेतकरी मेळाव्यास व अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवाजी कासव, समाधान जामदार, राजेंद्र गिडगे,डॉक्टर राजेंद्र दवंडे, अरुण पगार , प्रविण हेडा, ॲड. अन्वर पठाण , प्रसाद देशमुख यांनी केले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कारखान्याचे कादवा चेअरमन श्रीराम शेट्टे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयंत दिंडे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) नितीन आहेर, खेडगावचे दत्तात्रय पाटील, चांदवड तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव, देवळा म. वि. प्र. संचालक विजय पगार, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासकाका देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड , देवळा म. वि. प्र. माजी संचालक विश्राम निकम, किसान काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्ते, ऊबाठा गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर,देवळा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरदचंद्र पवार गटाचे देवळा तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, खुंटेवाडी चे सरपंच भाऊसाहेब पगार,उमराणे उपसभापती धर्मांअण्णा देवरे, देवळा शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा बापू जाधव, उपजिल्हाअध्यक्ष शिवसेना उबाठा सुनील पवार , उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील देवरे, वाजगाव येथील विनोद देवरे, उमराणे येथील व्यापारी खंडूकाका देवरे ,चांदवड येथील एडवोकेट ऍड .नरेंद्र कासलीवाल यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व मित्रपरिवार तसेच चांदवड -देवळा विधानसभा मतदारसंघातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन व संचालक, महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

