[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

‘माती मागतेय पेनकिलर’वर रंगणार काव्यचर्चा : वाचकपीठवर साहित्य चर्चा

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

*दिनांक :* रविवार, ११ जानेवारी २०२६
*वेळ :* सायंकाळी ठीक ६.०० वाजता

*थेट प्रक्षेपण :* वाचकपीठ-आपली कविता फेसबुक पेजवर
*सहभागी होण्यासाठी Google Meet लिंक :*
https://meet.google.com/cnc-vmhd-yfw

*कार्यक्रमाची रूपरेषा :*

१. सूत्रसंचालन : शर्मिला गोसावी, अहिल्यानगर

२. स्वागत / प्रास्ताविक : दादा ननवरे, अहिल्यानगर (५ मिनिटे)

३. पाहुण्यांचा परिचय : साहेबराव तुपे, लोणी (५ मिनिटे)

४. कवी सागर जाधव जोपुळकर यांचे मनोगत व दोन कवितांचे सादरीकरण (८ मिनिटे)

५. वाचकपीठ सदस्याचे अभिप्राय :
प्रा. शशिकांत शिंदे, कोल्हार (१२ मिनिटे)

६. प्रमुख अतिथींची भाष्ये :
– प्रा. डॉ. रमेश माने, अमळनेर (१५ मिनिटे)
– कवी श्रीकांत ढेरंगे, संगमनेर (१५ मिनिटे)

७. अध्यक्षीय भाष्य :
डॉ. मुकुंद कुळे, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, मुंबई

८. आभार / समारोप : माधुरी चौधरी, छ. संभाजीनगर

मराठी काव्यप्रेमींनो,
शेतीच्या वेदनेला, मातीच्या व्याकुळतेला वाचा फोडणाऱ्या या संग्रहाची चर्चा ऐकण्यासाठी अवश्य सहभागी व्हा!

ग्रामीण संवेदनांचा हुंकार: ‘माती मागतेय पेनकिलर’वर रंगणार काव्यचर्चा

वाचकपीठ प्रतिष्ठान’ आयोजित एक्कातरवी द्रूक-श्राव्य मासिक काव्यचर्चा येत्या रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. या विशेष काव्यचर्चेचा केंद्रबिंदू असेल कवी सागर जाधव जोपुळकर यांचा गाजलेला कविता संग्रह ‘माती मागतेय पेनकिलर’.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार डॉ. मुकुंद कुळे (मुंबई) राहणार आहेत. कार्यक्रमात नियोजित भाष्यकार म्हणून कवी श्रीकांत ढेरंगे (संगमनेर), प्रा. डॉ. रमेश माने (अंमळनेर) आणि कवी शशिकांत शिंदे (अहिल्यानगर) हे सहभागी होतील. हे तिन्ही भाष्यकार आपल्या विशिष्ट दृष्टिकोनातून ग्रामीण जीवन, संवेदना आणि समकालीन वास्तव यांचे प्रतिबिंब कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या कवितांमधून कसे झळकत जाते, यावर विस्तृत चर्चा करणार आहेत.
 ‘माती मागतेय पेनकिलर’ या काव्यसंग्रहाने आजच्या मराठी कवितेत ग्रामीण अनुभव, शेतकरी संवेदना आणि सामाजिक न्यायाची जाणीव या तिन्ही प्रवाहांचा संगम साधला आहे. शेतकऱ्याच्या जगण्यातल्या भीषणतेकडे कवितेच्या माधुर्याने पाहण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहात दिसून येतो, म्हणूनच या पुस्तकावर गंभीर साहित्यिक चर्चेची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ही काव्यचर्चा दूरस्थ पद्धतीने ‘वाचकपीठ – आपली कविता’ या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित होणार आहे.

ही काव्यचर्चा दूरस्थ पद्धतीने ‘वाचकपीठ – आपली कविता’ या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित होणार आहे.

वाचकपीठ फेसबुक पेज

या चर्चासत्राचे आयोजन भास्कर निर्मळ, मारुती सावंत, किरण भावसार, चंद्रकांत भोसले, भानुदास महानूर, डॉ. संजय थोरात, गिरीश सोनार, साहेबराव तुपे, प्रिया धारूरकर, डॉ. अविनाश कदम, योगिता राजकर, शरद ठाकर, दादा ननवरे, संदीप काळे आणि माधुरी चौधरी या वाचकपीठच्या सक्रिय सदस्यांनी केले असून, मराठी साहित्याच्या चाहते व रसिकांना या चर्चेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्राचार्य चंद्रकांत भोसले, भास्करराव पाटील निर्मळ, आणि किरण भावसार व वाचकपीठच्या सक्रिय सदस्यांनी केले आहे.
‘वाचकपीठ प्रतिष्ठान’ हे संस्थान जाई (चिंचोली फाटा), ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे कार्यरत असून मराठी कवितेच्या समृद्ध विचारमंथनासाठी गेली अनेक दशके सातत्याने प्रयत्नशील आहे. या ऑनलाइन चर्चेमुळे ग्रामीण व नगरी वाचकांना एकाच व्यासपीठावर आणून साहित्यिक चिंतनाचा संवाद घडवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करीत आहे.

*थेट प्रक्षेपण :* वाचकपीठ-आपली कविता फेसबुक पेजवर
*सहभागी होण्यासाठी Google Meet लिंक :
https://meet.google.com/cnc-vmhd-yfw

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या