[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

प्रा. विलास पवार यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

प्रा. विलास पवार यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त

 

माविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा येथे कार्यरत असलेले इतिहास विभाग प्रमुख ज्येष्ठ प्रा. व्ही. एम. पवार यांना ‘सावित्रीबाई फुले पुणे’ विद्यापीठ पुणे यांची ‘इतिहास’ या विषयाअंतर्गत ‘विसाव्या शतकातील चांदवड तालुक्याचा इतिहास’ या विषयात नुकतीच पीएच. डी. (विद्यावाचस्पती ) ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाली.

त्यानी चांदवड तालुक्यातील एतिहासिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलिक आध्यामिक, संदर्भाचा, पुराव्यांचा अभ्यास करून आपले संशोधन कार्य पूर्ण केले व पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला. त्याची मौखिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली.

या मौखिक परीक्षेच्या प्रमुख स्थानी पुणे विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर उपस्थित होत्या. तसेच बहिस्थ परीक्षक म्हणून औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. व्ही. बी. लाड होते. आणि गाईड म्हणून डॉ. त्रिंबक भीमराज राजदेव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले

या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती श्री माणिकराव बोरस्ते, उपसभापती श्री राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक श्री प्रल्हाद दादा गडाख, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. एस. एस. घुमरे, डॉ. शिल्पा सांगळे, डॉ. सचिन गोसावी, प्रा महेश बनकर, डॉ. सुनील धोंडगे, श्री प्रवीण कूलथे, प्रा. अभिन पोटे, प्रा. एस. ए. सूर्यवंशी आणि सर्व प्राध्यापक आणि सेवक वृंद या सर्वांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ यांचे कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या