ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने

जैसी चंदनाची मुळी । गिवसोनि
घेपी व्याळी । ना तरी उल्बांची खोळी ।
गर्भस्थानी ।।
कां प्रभावीण भानु । धुमे्वीण
हुताशनु । जैसा दर्पण मळहिनु ।
कहीच नसे.।।
तैसे इहीवीण एकले । आम्ही ज्ञान
नाही देखिले । जैसे कोंडेनि पां गुंतले।
बीज निपजे ।।
( जेथे ज्ञान आहे तेथे कामक्रोध
हे आहेतच ) जसा साप चंदनाच्या मुळाला वेढे घालून रहातो. किंवा पोटातील गर्भ गर्भ वेष्टणाच्या खोळीने
जसा आच्छादित असतो.
अथवा प्रभेशिवाय सूर्य धुराशिवाय
अग्नी किंवा मळहिन म्हणजे पाऱ्याशिवाय आरसा ही ज्याप्रमाणे
कधीच सापडायची नाहीत .
किंवा बीज जसे कोंड्याने आच्छादलेलेच उत्पन्न होते. त्याप्रमाणे
कामक्रोधाशिवाय एकटे असलेले
शुद्ध ज्ञान आम्ही कधी पाहिले नाही.
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक

