चांदवड तालूका ऍग्रो डीलर्स असोसिएशन : भारत बंद च्या आंदोलनात सहभागी

केंद्र सरकारने केलेल्या तीनही शेतकरी कायद्याच्या विरोधात व दिल्लीला जे पंजाब आणि हरियानाचे शेतकरी आंदोलन करत आहे त्यांना पांठिबा देण्यासाठी आपल्या सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी तसेच शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांनी ८ तारखेच्या भारत बंद मध्ये सहभागी व्हावे.
८ तारखेच्या संपात आपली चांदवड तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन संघटना सहभागी असून एक दिवस सर्व व्यावहारिक कामकाज बंद ठेवावे असे आवाहन चांदवड तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय दगुजी जाधव यांनी केले आहे

