[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा.नितीन लालसरे यांना निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड( प्रतिनिधी) : – नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा.नितीन लालसरे यांनी आज चांदवड येथील जाधव आणि कंपनी या दुकानास सदिच्छा भेट दिली.

प्रा.नितीन लालसरे यांचा सत्कार करताना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, शिवसेना शहरप्रमुख संदीप उगले,पप्पु कोतवाल,दिपांशु जाधव,कैलास सावकार,कचरू केदारे, कमलेश पवार आदी

यावेळी प्रा.नितीन लालसरे यांचा सत्कार काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, शिवसेना शहरप्रमुख संदीप उगले,पप्पु कोतवाल,दिपांशु जाधव,कैलास सावकार,कचरू केदारे, कमलेश पवार आदींनी केला. ,यावेळी विविध राजकीय,सामाजिक व शासकीय कामांविषयी चर्चा झाली. तसेच यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी
तालुक्यातील महत्वाच्या समस्यां बाबतीत निवेदन दिले.

 

 

निवेदन

मा . उद्धवजी ठाकरे

मुख्यमंत्री

 

विषय : शेतक-यांना न्याय मिळणेबाबत…

मा.महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपणांस विनंतीपुर्वक कळवु इच्छितो की, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात यावर्षी 15 जुलै ते 15 ऑगष्ट पर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या कालावधीत मका, सोयाबिन, बाजरी या पिकांचे फुलगळ होवून पिके जळाली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. तसेच 27 ऑगष्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत रोगट वातावरण व सततच्या रिम-झिम पावसामुळे मका, सोयाबिन, कांदा रोपे, टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाल्याची नासाडी झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले व शेतकरी हवालदिल झालेला आहे. तसेच बाजारपेठांमध्ये शेतीमालास कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने रस्त्यावर पिके फेकुन देण्याची वेळ आलेली असुन शेतकरी पुर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे.
मागील वर्षापासुन कोरोना विषाणूमुळे राज्य शासनाला नाईलाजाने वेळोवेळी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांवर बंधने आल्यामुळे शेतक-यांनी उत्पादित केलेला शेतीमालास मागणी नाही. त्यामुळे मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्यामुळे कांदा, टोमॅटो, मिरची या पिकांसह इतर भाजीपाला शेतीमालास अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत असुन बाजारपेठेत शेतीमाल नेण्याचा वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही. रस्त्या-रस्त्याने शेतक-यांनी शेतीमाल फेकुन दिल्याचे निदर्शनास येत आहे. पिकाचा खर्च, चालु पिकासाठी घेतलेले कर्ज, कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, मुलांची शिक्षण कशी करावी असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकलेला आहे. या परिस्थितीत शेतकरी पुर्णपणे मेटाकूटीस आलेला आहे. शेतीमालास उत्पादन आधारीत बाजारभाव मिळत नसल्याने शेतक-यास तोट्यात शेती करावी लागत आहे. तसेच आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय स्विकारत आहे. तरी शेतक-यास योग्य तो न्याय मिळवुन देण्यासाठी खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहे.


१) यावर्षी नैसर्गिक व शेतीमालास बाजारभाव नसल्याने शेतकरी पुर्ण हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे बांदावर जावून प्रत्यक्ष शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन एकरी 50 हजार अनुदान मिळावे, ही विनंती.
२) कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या ड्रीप अनुदान योजनेचे प्रस्ताव मागील 3 वर्षांपासुन प्रलंबित आहेत. तसेच शेततळे योजना, कांदा चाळ योजनेचे अनुदान अद्याप पर्यंत शेतक-यांना मिळालेले नाही. शासकीय योजनांच्या फाईली प्रलंबित आहेत. याबाबत संबंधित कार्यालयास आपल्या मार्फत सुचना व्हाव्यात.
३) फळबागांचे देखील ड्रोनद्वारे सर्वेक्षण / पंचनामे करुन अनुदान मिळावे.
४) कांदा शेतीमालास कमीत कमी रु. 3000/-हमीभाव मिळावा. तसेच मागील वर्षी एप्रिल 2020 ते जुलै 2020 व एप्रिल 21 ते आजतागायत या कालावधीत कांदा शेतीमाल अल्प दरात विक्री झालेला आहे. त्यामुळे कांद्यास रु.500/- प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान जाहिर करावे.
५) पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती वाढल्यामुळे महागाई वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण असावे.
प्रत माहिती व कार्यवाहीसाठी सादर
1) मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
2) मा. उपविभागीय अधिकारी सो., उपविभागीय कार्यालय, चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या