मनमाडचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त शिरिषकुमार कोतवाल यांनी केला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
मनमाड : – मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व युवक क्रांती गणेश मित्र मंडळाचे आधार स्तंभ बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
चांदवडचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मनमाड शहर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंके.काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भिमराव जेजुरे, दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विक्रम देवरे, नगरसेवक छोठुभाऊ पाटील , बबलूभाऊ पाटील तसेच मनमाड शहरातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

