मनमाड बाजार समितीच्या
राजकीय हालचाली गतिमान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने बाजार समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहे त्यातच पोलीस व्हेरिफिकेशन ने जाण आणली आहे
आज सकाळपासूनच मनमाड बाजार समिती च्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून पोलीस व्हेरिफिकेशनसाठी काही राजकीय नेत्यांनी गर्दी केल्याने आता कुणाची वर्णी लागते याची चर्चा सुरू झाली आहे मनमाड बाजार समितीची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून नांदगाव चे सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र आता शासन नियुक्त प्रशासकीय मंडळात आपली वर्णी लागावी म्हणून अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली त्यानुसार मनमाड बाजार समितीच्या कार्यक्षेत्र व त्या बाहेरील लोकांनी आपली वर्णी लागावी लागावी म्हणून राजकीय पायघड्या घातल्या आणि अखेर दहा जणांची नावे यात असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन व्हेरीफिकेशन करीत आपले चारित्र्य शुद्ध आहे असे सांगून व्हेरिफिकेशन केल्याची चर्चा मनमाड बाजार समितीच्या आवारात जोरदारपणे पसरली त्यामुळे आता बाजार समितीवर जे शासन नियुक्त प्रशासक मंडळ येणार आहे त्यात कुणाची वर्णी लागते हा चर्चेचा विषय असला तरी मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना प्रतिनिधित्व मिळेल असाही राजकीय तज्ञ मंडळींचा अंदाज असून बघूया आगामी काळात याठिकाणी कुणाची वर्णी लागते ते

