कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीकडुन कांदा पिक चर्चासत्र उत्साहात संपन्न

उपस्थित कंपनीचे डॉ. विनिय टेंगे, किरण ठाकरे, गणपतराव चौगुले, शिवाजी कासव, बाळकृष्ण कोतवाल, रमेश कोतवाल, शिवाजी कोतवाल, तुकाराम चौघुले, संतोष बडोदे, साहेबराव कोतवाल, अर्जुन शिंदे, संजय साठे, धोंडीराम सलादे, चरण कोतवाल, एकनाथ चौघुले, राजेंद्र थोरे, नितीन थोरे व इतर शेतकरी उपस्थित होत व ॲग्रो मॉलचे संचालक दिपांशु अरुण जाधव व रेवण संजय जाधव
चांदवड येथील मे. जाधव आणि कंपनी ॲग्रो मॉल, चांदवड व कोरोमंडल इंडस्ट्रीज लि. कंपनी मार्फत चांदवड येथील लासलगाव रोड वरील मे. जाधव आणि कंपनी ॲग्रो येथे कांदा पिक परिषद आयोजित केली होती. त्यावेळेस डॉ. गणेश टेकाळे यांनी शेतकरी बंधु कांदा पिक नियोजन, बियाणे टाकण्यापासुन ते रोप तयार करणे, कांदा लागवड करणे व त्यासाठी लागणारे रासायनिक खते नियोजन कसे करावे. औषध फवारणी कशी करावी वेळेत खत पाणी औषधे नियोजन करावे, कांदा लागवड करणेचे वेळेस एकरी गो प्लस 200 के.जी. व निवोनी पेड 100 के.जी. व 25 किलो मायक्रोबुट वापर करावे व पहिले पाणी भरणे वेळी कांदा लागवड केलेनंतर 10 ते 15 दिवसात रासायनिक खत ताकावे व नंतर 40 ते 45 दिवसांनी पोटॅश युक्त खत वापर करावा. 30 टक्के सेंद्रीय खत व 70 टक्के रासायनिक खताचा वापर करावा. एन.पी.के. सह सल्फर वापर केल्यास मोठ्याप्रमाणात कांदा पिकमध्ये उत्पन्नात वाढ होण्यास होणार आहे.
तरी शेतकरी बांधवांनी कांद्यासाठी प्रमाणातच रासायनिक खते व पाण्याचा वापर करावा. माती परिक्षण करुन रासायनिक खते वापर करावा. यावेळी चाडा अध्यक्ष श्री.संजय जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय चौधरी साहेब यांनी केले व कोरोमंडळ या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कंपनीचे डॉ. विनिय टेंगे, किरण ठाकरे, गणपतराव चौगुले, शिवाजी कासव, बाळकृष्ण कोतवाल, रमेश कोतवाल, शिवाजी कोतवाल, तुकाराम चौघुले, संतोष बडोदे, साहेबराव कोतवाल, अर्जुन शिंदे, संजय साठे, धोंडीराम सलादे, चरण कोतवाल, एकनाथ चौघुले, राजेंद्र थोरे, नितीन थोरे व इतर शेतकरी उपस्थित होत व ॲग्रो मॉलचे संचालक दिपांशु अरुण जाधव व रेवण संजय जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

