चांदवड तालुक्याचे तहसीलदार मा.प्रदीपजी पाटील यांनी चांदवड येथील मे जाधव आणि कंपनी ला भेट दिली. रासायनिक खते, बियाणे , कीटकनाशक व कृषी निविष्टा विषयी माहिती जाणून घेतली. त्या निमित्त त्यांचे स्वागत चांदवड तालुका काँग्रेस कमीटी अध्यक्ष मा.संजय दगुजी जाधव यांनी केले. तालुक्यातील विविध समस्या,शासकीय,व कोरोणा परिस्थिती वर चर्चा केली. शेतमालाचे भाव , हमी भाव , अशा गोष्टीवर शासकीय स्तरावरून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी मा प्रदीप पाटील दिले. यावेळी तालुक्यातील विविध समस्या,शासकीय,व कोरोणा परिस्थिती वर चर्चा केली. यावेळी मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव, अरुणशेठ जाधव, बापू शिंदे, कमलेश पवार, तसेच शेतकरी उपस्थित होते

