[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे पि एस आय पांडुरंग डघळे यांचा नागरी सत्कार

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगांव रेपाळ येथे पि एस आय पांडुरंग डघळे यांचा नागरी सत्कार

आडगांव रेपाळ( वार्ताहर) :- पाटोदा ता.येवला येथील मध्यम कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा पांडुरंग माधव डघळे यांची पि.एस.आय पदी निवड झाल्या बद्दल आडगांव रेपाळ ग्रामस्थातर्फे सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.पांडुरंग डघळे यांची 1994 च्या नवी मुंबई राज्य राखीव बॅचचे पोलीस हवालदार म्हणून निवड झाली होती. 2014 च्या अंतर्गत परीक्षेच्या निवडीनंतर 2021 मध्ये कोर्टाचा निकाल लागून नुकतीच पीएसआय पदी निवड झाली आहे. त्याबद्दल आडगांव रेपाळ येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

आडगांव रेपाळ : पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल पांडुरंग डघळे यांचा सत्कार करताना सरपंच तुकाराम गुंजाळ ,उपसरपंच बाबासाहेब महाले, चेअरमन रावसाहेब बढे, मा.सरपंच नारायण गुंजाळ, फकीरा निकम,निव्रुती ठोंबरे, रमेश निकम,दत्तु नाईकवाडे,गोरख जगताप ,सुरेश बढे,गोरख गायके, अरुण मुरकुटे आदी .(छाया:योगेश महाले )

पांडुरंग डघळे हे पाटोदा येथील मध्यम शेतकरी कुटुंबातील युवक असुन त्यांनी 1992 मध्ये पुणे विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर 1994 मध्ये राज्य राखीव पोलीस दलात नवी मुंबई येथे पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर बेसिक कमांडो, ऑफिस असिस्टंट, ग्रेनेड आदी क्षेत्रात वेगवेगळे ट्रेनिंग पूर्ण करून गडचिरोली, केरळ, पाँडेचेरी अशा विविध ठिकाणी सेवा बजावून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. पावती म्हणून त्यांना सव्वीस वर्षांच्या सेवेत 163 वेगवेगळे बक्षिसे व प्रशस्तीपत्र मिळाले. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पारितोषिकही मिळाले. परंतु केवळ पोलीस हवालदार पदावर कायम न रहाता वरिष्ठ पदाला गवसणी घालण्यासाठी 2014 मध्ये अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. परंतु परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पास होऊनही सदर परीक्षेचे प्रकरण न्याय प्रविष्ट झाल्यामुळे मॅट मध्ये त्यांना आपल्या पदावर दावा करावा लागला व या पदासाठी 2021 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत त्यांनी नवी मुंबई येथे 1994 ते 2006, नाशिक पोलीस अकॅडमी येथे तीन वर्षे प्रशिक्षक व अकरा वर्ष कॅन्टीन मॅनेजर म्हणून काम पाहिले. परंतु उशिरा का होईना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय मिळाला आणि नुकतीच मॅटने त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्तीचा मार्ग मोकळा केला. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना नुकतीच धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. त्याबद्दल आडगाव रेपाळ व परिसरातील गावांमध्ये तसेच सामाजिक संस्था राजकीय कार्यालय आदी ठिकाणी नागरी सत्कार केला. त्यांच्या या यशाबद्दल आडगांव रेपाळ येथे सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपसरपंच बाबासाहेब महाले, चेअरमन रावसाहेब बढे, मा.सरपंच नारायण गुंजाळ, फकीरा निकम,निव्रुती ठोंबरे, रमेश निकम,दत्तु नाईकवाडे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निकम, ज्ञानेश्वर बागुल, सुरेश बागुल,गोरख जगताप ,सुरेश बढे,गोरख गायके, अरुण मुरकुटे,
योगेश महाले ,गोरख पवार,संजय तनपुरे, दत्तु गायके,पांडुरंग गायके,गणेश पाटील,द्वारकानाथ महाले आदी ग्रामस्थ व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल
ज्येष्ठ सहकार नेते अंबादास बनकर, क्रुषी सभापती संजय बनकर यांनी ही त्यांचे अभिनंदन केले.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या