[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सोमवारी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड नांदगाव दौऱ्यावर

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

 

सोमवारी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड नांदगाव दौऱ्यावर

नांदगाव : -सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड नांदगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे
माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड नांदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा सकाळी 11 वाजता गुप्ता लॉन्स नांदगाव मालेगाव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात आमदार राठोड काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नांदगाव तालुक्यात बंजारा समाज बांधवांची मोठी संख्या असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे राजकारण हळूहळू तापू लागले आहे त्यामुळे या मेळाव्याकडे विशेष लक्ष असून न्याय डोंगरी भागात या बांधवांची संख्या अधिक आहे त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या