आजच सब वे मोकळा करावा या मागणीसाठी सब वे मध्ये उतरून आपच्या दोन कार्यकर्त्यांचे आंदोलन
नांदगाव /राजेंद्र तळेकर
येथील सबवे मध्ये उतरून आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून आजच सब वे मोकळा करावा अशी त्यांची मागणी आहे नांदगाव येथील सब वे मध्ये पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन तो बंद झाला होता या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे विशाल वडघुले व योगेश या दोन कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी सब वे मध्ये उतरून आंदोलनाला सुरुवात केली दीड दोन तास झाले तरी त्यांच्याकडे कोणी बघितले नसल्याने नांदगावकर यांचा संताप अनावर होत आहे प्रशासनाच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला आहे

