[masterslider id="2"]
क्रीडा राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नितीन तनपुरे याला ॲथलेटिक्स मध्ये सुवर्णपदक

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

एनसीसी मध्ये मिळालेली प्रेरणा व निवृत्त माजी सैनिक आजोबा रमेश तनपुरे यांनी केलेले मार्गदर्शन व स्वतः च्या मेहनती सरावामुळे हे यश शक्य झाले ,असून भविष्यात संधी मिळाल्यास भारतीय सैन्यदलात किंवा पोलीस दलात भरती होऊन भारत मातेची सेवा करायची आहे.
– नितीन तनपुरे

नितीन तनपुरे याला ॲथलेटिक्स मध्ये सुवर्णपदक

 

नेपाळ येथे पोखरा स्टेडियम मध्ये झालेल्या 100 मीटर ॲथलेटिक्स मध्ये सुवर्णपदक घेतांना नितीन तनपुरे

आडगांव रेपाळ (वार्ताहर):- इंडो-नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२१, पोखरा इंटरनॅशनल स्टेडीयम नेपाळ येथे झालेल्या १०० मीटर ॲथलेटिक्स मध्ये येथील नितीन नवनाथ तनपुरे (आडगांव रेपाळ) याला सुवर्णपदक मिळाले. १०० मिटर अँथलेटिक्स प्रकारात नऊ देशातील ९ खेळाडूंनी सहभाग घेत घेतला.होता. पहिल्या राऊंडमध्ये १०.५०सेकंदात अंतर कापून अव्वल स्थान प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले. नितिन तनपुरे हा कोपरगाव येथील के .जे .सोमैय्या कॉलेजचा विद्यार्थी असून येथील अँकडेमी मध्ये सहा महिन्यापासून सराव करत होता, त्याच्या गावाजवळुन गेलेल्या सहयाद्री पवर्त रांगा च्या परिसरात त्यांने सराव केला. त्याला निवृत्त सैनिक त्याचे आजोबा रमेश तनपुरे यांचे मार्गदर्शन लाभले

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या