[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कै. देवाजीनाना गांगुर्डे स्मृतिप्रीत्यर्थ “शिक्षकरत्न” पुरस्कार वितरण सोहळा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कै. देवाजीनाना गांगुर्डे स्मृतिप्रीत्यर्थ “शिक्षकरत्न” पुरस्कार वितरण सोहळा

 

कै. देवाजीनाना गांगुर्डे स्मृतिप्रीत्यर्थ “शिक्षकरत्न” पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मान्यवर

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था चांदवड यांच्यावतीने दरवर्षी कै. देवाजीनाना गांगुर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “शिक्षकरत्न” पुरस्कार वितरण सोहळा पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.
तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थेचे सर्व सेवानिवृत्त सभासद,केंद्रप्रमुख, शिक्षक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कै. देवाजीनाना यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती तुळसाबाई गांगुर्डे, शिक्षकनेते मा.काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष श्री.केदुजी देशमाने, राज्य सल्लागार श्री.दादाजी सावंत, पतसंस्था चेअरमन श्री.साहेबराव पवार, व्हा.चेअरमन सौ.मालती सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री.बुधेसिंग ठोके, तालुका नेते श्री.किरण गांगुर्डे सरचिटणीस श्री.श्रीकांत देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष श्री.शिवाजीराजे शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष श्री.विजय पवार यांनी केले.
पुरस्कारार्थी
1)श्री.जनार्दन देवरे, दरेगाव
2)श्री.सोमनाथ पवार,जाधववाडी
3)श्रीमती योगिता निफाडे,खतवडवस्ती
4)श्रीमती जयश्री सुतार,तिसगाव
5)श्री.संतोष पवार,महिपतवस्ती
6)श्री.प्रकाश आहिरे,वाहेगावसाळ
7)श्री.पंडित गायकवाड, कण्हेरवाडी.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या