स्पर्धेसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन
चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ आयोजित
काव्यलेखन स्पर्धेसाठी स्वलिखित एक कविता दोन प्रतीत पाठवावी
(कोविड19 च्या नियम व अटींमुळे स्पर्धा फक्त चांदवड तालुक्यापुरती मर्यादित आहे)
महत्त्वाच्या सूचना
१) कविता स्वलिखितच असावी.
२) स्पर्धा दोन भागात असेल.
खुला गट : सर्वांसाठी असेल
बाल गट : 16 वर्षे खालील मुलांसाठी
३) एकच कविता दोन प्रतीत (लिहून अथवा टाईप केलेली प्रिंट) पाठवावी.
४) कवितेच्या खाली नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वय व खुला गट अथवा बाल गट असा उल्लेख असावा.
५) स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही.
६) स्पर्धेची पारितोषिके पुरस्कार वितरण समारंभात दिली जातील.
७) स्पर्धेच्या नियमांत आवश्यक बदल करण्याचे अधिकार आयोजकांचे असतील.
८) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
◆प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पारितोषिके देण्यात येतील.
◆पारितोषिकांचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुस्तके अशा स्वरूपात राहील.
आपली कविता दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोच करावी.
पत्ता :
सागर जाधव जोपुळकर
जाधव आणि कंपनी, शॉप नंबर ३, मार्केट यार्ड चांदवड, चांदवड, जि नाशिक ४२३१०१
९४०४८०५०६८
संपर्क :
रावसाहेब जाधव
९४२२३२१५९६

