
युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर
चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ चांदवड तर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार नाशिक येथील लेखक , पत्रकार प्रशांत भरवीरकर यांना, तर चांदवडी रुपय्या सामाजिक प्रेरणा पुरस्कार धोडंबे येथील सामाजिक कार्य करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट मित्रमंडळ धोडंबे या ग्रुपला देण्याचे घोषित करण्यात आले आहे. तसेच चांदवडी रुपया तर्फे घेण्यात येणाऱ्या काव्यलेखन स्पर्धांचे निकाल लवकरच घोषित करण्यात येतील. पुरस्कार, पारितोषिके व बक्षिसांचे वितरण चांदवडी रुपया साहित्य कलारसिक मंडळाच्या आगामी वार्षिक कार्यक्रमात केले जाईल तसेच कवी रावसाहेब जाधव यांच्या गरगर मोळ्या या त्रैभाषिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात केले जाईल. असे मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी सांगितले

