[masterslider id="2"]
जाहिरात राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेतकरी टाइम्स दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

शेतकरी टाइम्स दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

नागापूर (राजेंद्र तळेकर)नागेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत दिवाळीच्या दिवशी नागेश्वराचे प्रांगण मंद प्रकाशाच्या दिव्यानी फुलून गेले होती नयन रम्य ती सायंकाळ वाढत जाणारी गर्दी सोबत भजन संगीताचे सूर याच आनंददायी वातावरणात साप्ताहिक शेतकरी टाइम्स या वीस एकवीस च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शानदार पणे करण्यात आले. साप्ताहिक शेतकरी टाइम्स 20 21 चा सातवा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार आणिल आहेर,माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीचे विनोद शेलार मनमाड चे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, अतुल पाटील शेतकरी टाइम्स चे संपादक राजेंद्र तळेकर डॉक्टर निकम राष्ट्रवादी जिल्हा युवा उपाध्यक्ष दत्तू पवार अशोक डघळे ,विठ्ठल आहेर ,कैलास शिंदे, दीपक गरुड ,देविदास उगले ,भागवत सोमासे ,भूषण तळेकर ,गणेश लाड, सौरभ निकम अॅड गंगाधर बिडगर,साहेबराव पाटील सुभाष नहार ,भिमराव जेजुरी  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील ,डॉक्टर नीलिमा अहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली शेतकरी टाईम च्या या दिवाळी अंकात मान्यवरांचे वाचनीय लेख कविता व्यंगचित्र व वात्रटिका यांनी हा अंक सुंदर बनला हे वाचकांच्या भरभरून शुभेच्छा तसेच जाहिरातदारांच्या शुभेच्छांनी अंक सजला आहे या अंकाचे अनेक मान्यवरांनी स्वागत केले

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या