[masterslider id="2"]
लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

आदिवासी झोपडीतील आदर्श जीवन ते सद्यस्थीती

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी झोपडीतील आदर्श जीवन ते सद्यस्थीती

भारत हा जगातील खेड्यांचा देश मानला जातो.खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२० मध्ये खेड्याकडे चला असा नारा दिला होता कारण खेडी ही अतिदुर्गम भागातील असल्याने तीथ कोणतीही विकासाची सुविधा नव्हती आदिवासींची गाव ही डोंगराळ भागात वाड्या पाड्यावर वसलेली ग्रामीण भागात वीस, पंचवीस झोपड्यांच्या समूहाला पाढा म्हणतात. पावसाचे मोठे प्रमाण पाहुन घरांची ठेवण ही उतरत्या छपरांची असतं घरावर नळीची बंगलोरी कौलं वापरलेले असत ह्या कौलांमुळे भर कडक उन्हाळ्यात सुध्दा हवा फिरती असल्याने घरात कोणतीही गरमी नसायची कांहींची घरं ही पळसाच्या किंवा सांगण्याची पानांनी बांबू व इतर झाडांच्या फांद्यांचे ओंबन ठोकून सजवलेल्या छपराची असत ही घरं पावसाळ्यात गळल्याशीवाय रहात नाही घराच्या भिंती ह्या कारवी किंवा बांबूच्या किमटीचा कुड तयार करून चिखल,गाळ लिंपून शेणाने सारवलेल्या असतं घराच्या पुढील मोकळी जागा म्हणजे अंगण अंगणाच्या बाजूला फुलं झाडं किंवा शोभेची झाडं लावली जाई लहाणच घर ( झोपडी) परंतु त्यात सगळ्या जीवनपयोगी वस्तू साठवणीसाठी व्यवस्था केली असायची घरातील मध्यभागी जागा म्हणजे ओसरी ओसरीवर धान्य काढण्यासाठी उखळ , मुसळ एका कोपऱ्यात धान्य दळण्यासाठी दगडी जातं मांडलेलं असायचं घरातील एका खोलीत झोपण्याची व्यवस्था त्यात गोदड्या,रगी ठेवण्यासाठी दोराची किंवा तारेची वळाणी टांगलेली असायची लहाण बाळासाठी हिंदी (झोका) केलेला असायचा मधल्या खोलीत स्वयंपाकाची व्यवस्था त्यात भांडी , भाजीपाला व इतर स्वयंपाकाचे साहित्य ठेवण्यासाठी बांबूपासून तयार केलेला उतीव असायचा तसेच मांसाहारी पदार्थ ठेवण्यासाठी शिंकाळे टांगलेले असत ही स्वयंपाक खोलीत चिखलाच्या चुलीत स्वयंपाक तयार करण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सर्पन ( फाट्या ) वापरल्याने ही झोपडी धूराने काळीकुट्ट झालेली असायची घरातील एक मधली खोली ही कोठारासाठी नेमलेली असावी त्यात खळ्यातून पीक मळून आनलेलं धान्य ठेवत ते साठवण्यासाठी बांबूपासून विनलेली खुटवली किंवा भोत असायचा कारण त्यावेळी गोनपाट ,पोतं , गोणी ह्या तूरळक असत झोपडीतील शेवटच्या खोलीत जनावरांसाठी गोठा असायचा गोठ्यातील एका कोपऱ्यात पावसाळा ऋतूत जनावरांसाठी तनस ठेवले असायचे त्याच कुडाच्या भिंतीला लागून इंधनासाठी लाकूड फाटा सर्पन ह्याची सुरूढ रचलेली असायची त्यातच शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या जात असतं
पुर्वीपासून कुडाच्या झोपडीत आदिवासींची संस्कृती नांदत होती दारिद्र्य असूनही माणसं निसर्गानियमाला धरुन मानवी तत्वावर आधारित जीवन जगतात झोपडी ही निसर्गाच्या मातीत भक्कम उभी आहे निसर्गातील वृक्षावल्ली, हिरव्यागार वनराईच्या सावलीत आदिम काळापासून दरीखोरीत विसावलेली असल्याने तेथील मानसाला संपूर्ण वृक्षाची ओळख झाली व पक्ष्यांचे आवाज हे आजही ठाऊक आहेत त्यातच आपला संसार थाटून असलेली श्वापदे असा सारा आदिवासींचा गोतावळा आहे ह्या संपूर्ण विलक्षण दृष्टीची छाप पाड्यावरील झोपडीत राहणाऱ्या मानसावर पडली आहे तशी आदिवासी भागातील अनेक कवींच्या कवितेतूनही झोपडीच्या ह्या विषयावर प्रांजळपणे प्रकटलेली आहे .
खरे तर झोपडी हे प्रतीक आदिवासींच्या संस्कृतीच्या आदर्शाची मांडणी झोपडी दर्शवीत आहे झोपडीत भूक, उपासमार, गरीबी असूनही माणसं निराश न होता परिस्थितीने गरीब पण मनाने मात्र श्रीमंत असतात ह्याचे उदाहरण म्हणून झोपडीतील आदर्श कसा बहरून जातो आणि संस्कृती नांदत जाते हे दाखवित आहे कारण आज आता खेड्यातील मानसाचाही भौतिक, शैक्षणिक विकास झाला त्यातच हौशी मौजेच्या सुविधा वाढल्या त्यामुळे खेड्यातील मानसाने शहरातील वातावरणात धाव घेतली विकास होणे पण महत्वाचे असले तरी शहरात राहुनही निसर्गाच्या सान्निध्यातिल उदास पाड्यावरील झोपडीतील जीवन जगता येत नाही यात शंका नाही.

सुभाष नारायण कामडी
संशोधक,
मो नं ९५७९५४३३०८

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या