दलित कवितेचे मराठी साहित्यातील स्थान आणि वेगळेपण…
भारत हा सर्व धर्मसंपन्न असलेला देश वसावत वादाच्या सुर्य हव्यासामुळे दारिद्र्याच्या खायित लोटल्या गेलेल्या भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीतून नष्ट झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दशकानंतर मराठी साहित्यामध्ये आधुनिक कालखंडात अनेक नवनविन साहित्य प्रवाह उदयास आले त्यातील दलित साहित्य हा स्वतंत्र प्रवाह उदयास आला खऱ्या अर्थानं त्यातील दलित कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे वेदनेचा हुंकार आणि संघर्षांची जाणिव ज्या साहित्य प्रकारातून प्रकटले आहे तो साहित्य प्रकार म्हणजे दलित कविता ही शोशीत, वंचित सर्व स्तरावरील समाजातील प्रत्येक मनुष्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी कविता ठरली आहे संघर्ष करावा तर असा जातीभेद बाजूला ठेवून प्रचंड विद्रोह, नकार, दुःख इत्यादी वैशिष्ट्यासह प्रचंड प्रमाणात आक्रमकता आणि आत्मविश्वास तसेच अनुभुतिचे ज्वलंत प्रश्न निर्माण करण्याची आवाहण क्षमता अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दलित कवितेचे वेगळेपण नोंदवता येते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन निर्माण झालेल्या या विद्रोही कवितेने मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे अज्ञानामुळे मूक होऊन अंधारात चाचपडत रहात जगण्यात गुलामीच्या जोखडातून पिचून चाललेल्या अन्यायग्रस्त दलित समाजांच्या व्यथा, वेदना या सर्वांना दलित कवितेच्या माध्यमातून वाचा फुटली आहे कवी ज वि पवार कवितेतून म्हणतात.
तू झालास मूक समाजाचा नायक
तू निघालास तेव्हा काळोखाच राज्य होतं
सुर्यफुलांनी पाठ फिरवली होती
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्याने तुझें स्वागत केलेतू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत
तू फूंकलेश रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युध्दात जवानांना उभे करावे तसेतुझे शब्द जसे की
महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागलीआज पन्नास वर्षांनीं अनुभवतोय
सुर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगुल प्रतिक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालय.
तू झालास मूक समाजाचा नायक ही कवी ज वि पवार यांची नाकेबंदी या काव्यसंग्रहातील कविता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित जीवनातील प्रत्येक घटकाला सहानुभूतीने स्पर्श करून संघर्षांच्या जाणिवेतून अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती दृढनिश्चय घेऊन दुःख, गरीबी, बेकारीच्या अज्ञानी लोकांमध्ये आत्मभान जागृत करून विषमतेने बुरशटलेल्या विचारांची वाट मोकळी करत गुलामीच्या बेड्या फेकून देत संघर्ष तीव्र करुन सुंदर विचार धारण करून अखेर जीवनातील अनिष्ठ प्रथेला विरोध करत यशस्वी जीवनासाठी अखेर पर्यंत लढण्याचे आवाहन ह्या कवितेत करत कवीने १९२७ साली रायगड जिल्ह्यातील महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला १९७७ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी दुखात पिचलेल्या समाजाला शिक्षण व न्याय हक्क यादृष्टीने वाचा फोडण्यासाठी १९२० मध्ये मूकनायक हे साप्ताहिक व १९२७ मध्ये बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले त्याचाही उल्लेख कवितेत आला आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जीवनात कुरबुरी होतच असतात म्हणून कवी वामण निंबाळकर म्हणतात.
शब्दांनीच पेटतात घरे दारे
देश आणि मानसे सुध्दा
शब्द विझतात आग ही
शब्दांनी पेटलेल्या मानसांची
अशा स्वरूपाची आक्रमक शब्दशक्ती दलित कवितेतून प्रकटली आहे दलित कविता ही इतर कवितेपेक्षा वेगळी आहे प्रस्थापित कवितेतील रुढ रचना बंध या सर्वांना नकार देऊन क्वचित गघप्राय झाली आहे भोळसट भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेण्यापेक्षा प्रखर वास्तवाच्या निखाऱ्यातून जाणवलेले चटके सोसून वास्तविक स्थिती दर्शवते दलित समाजातील पहिला उद्रेक अथवा विद्रोह हा कवितेतून समाजाला आत्मनिष्ठबळ देत आहे कवी महायुद्ध काव्यसंग्रहातून म्हणतात
मी विद्रोही दिशेने
जाणार आहे
कोणत्याही पातळीवर
जाण्याची माझी तयारी आहे
मी नाही विझू देणार
माझे पेटलेले रक्त
कवी वामण निंबाळकर यांच्या आई, गावकुसाबाहेरच्या कविता, महायुद्ध, वाहत्या जखमांचा प्रदेश, ह्या काव्यसंग्रहातून दलित कवितेचे वेगळेपण सिद्ध झाले आहे स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेले कवी नामदेव ढसाळ हे तर स्वातंत्र्यदिनाबद्दल म्हणतात की,
पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ट
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे
रामराज्याच्या कितव्या घरात आपण होतात
उन्दगम विकास उंची संस्कार संस्कृती
कंचा मुलभूत अर्थ स्वातंत्र्याचा
देशाला स्वातंत्र्य मिळवूनही दलितांच्या वाट्याला अन्याय, अत्याचार सहन करावा लागत आहे त्यामुळे स्वातंत्र्य मिळवूनही माणूस निराशच आहे म्हणून काय अर्थ आहे स्वातंत्र्य मिळवून असे म्हणणाऱ्या कवी नामदेव ढसाळांची कविता म्हणजे शब्दातून उफाळनारा ज्वालामुखी आहे.
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
आता या शहरा शहराला आग लावीत चला
अशी अन्यायाविरुद्ध विद्रोही अश्रू अनावर आलेली अनेक रुपे नामदेव ढसाळ यांच्या कवितेत प्रकटली आहेत त्यांचे आमच्या इतिहासातील एक अपरीहार्य पात्र, प्रियदर्शनी, खेळ, गोलपीठा, तुझे बोट धरून चाललो आहे, तुही यत्ता कंची, मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे, मुर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले,या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दारात उभा आहे, गांडू बगीचा, निर्वाणा, अगोदची पीडा ह्या काव्यसंग्रहातून दुःख दारिद्र्य, अन्याय, समाजावर लादलेल्या अनिष्ट प्रथा तसेच मानसाला व समाजाला जनावरांसारखं जीवन जगण्यास बाह्यवळण कररणाऱ्या सर्व गोष्टी विरुद्ध शाब्दिक बंड पुकारले आहे मराठी साहित्यामध्ये आई या विषयावर प्रांजळपणे भरभरून काव्यलेखन केले आहे तसे दलित कवितेतूनही आई या विषयावर काही प्रमाणात पडसाद उमटले आहेत.
कवी यशवंत मनोहर म्हणतात की,
दुनियेत चंद्र सुर्याच्या
मज कुणीच घेतले नाही
या जन्मात कधी माझ्या कुणी आई झाले नाही
आईने लेकराला माया द्यावी तसे समाजातही स्थान मिळावे ह्यासाठी दुःख हे केवळ आई नसल्याचे किंवा आई गेल्याचे नसून व्यक्ती म्हणून आपल्या वाट्याला काहीच आले आहे अशी कवी यशवंत खंत करतात कवी यशवंत मनोहर यांचे अग्नीचा आदिबंध, उत्थानगुंफा, काव्यभिमायन, अग्नी परीक्षेचे वेळापत्रक, जीवनायन, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता, प्रतीक्षायन युगमुद्रा, युगांतर, स्वप्नसंहिता,असे काव्यसंग्रह दलित कवितेचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी अनुभव विश्व साकारत आहेत.
कवी दया पवार यांच्या कवितेतून दलितांच्या दुःख विद्रोहाची प्रतिभा उमटली आहे
हे महाकावे
तुला महाकवी कसे म्हणावे
एक जरी अन्याय अत्याचार
करणारा श्लोक तु लिहला
असता तर तुझे नांव
काळजावर कोरले असते
समाजाने ज्यांना महाण कवी मानले त्यांनी आमच्या दुःखाचा एखादा श्लोक वेशीवर टांगण्यासाठी रचला असता तर त्याचे नाव काळजावर कोरले असते असे कवी दया पवार म्हणतात व महाकवीचं कवीपण नाकारतात दया पवार यांचे कोंडवाडा, धम्मपद हे काव्यसंग्रह अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात कवितेतून प्रकट होतात.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की,
जग बदल घालुनी घाव
सांगुन गेले मला भीमराव
गुलामगिरीच्या या चिखलात
रुतीनी बसला का ऐरावत
अंग झाडुनी नीघ बाहेरी
घे बिनिवरी घाव
एकजुटीच्या रथा वरती
आरुढ होवुनी चल बा पुरती
नवमहाराष्ट्र निर्मुल जगती
करी प्रगती नीज नाव
अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरीतून गरीब, श्रीमंत, जातीभेदाच्या विषमतेवर घाव घालून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आहे . दलित समाजातील अनेक कवींनी अन्यायाविरुद्ध संघर्षांची जाणिवेतून प्रत्यक्षरीत्या कवितेच्या माध्यमातून वाचा फुटली आहे व अप्रत्यक्षपणे योगदान दिले आहे कवी इंद्रजित आलटे, केशव मेश्राम, राजा ढाले यांच्यापण कविता तितक्याच महत्वाच्या आहेत लोकशाहिर वामणदादा कर्डक यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित ३००० गीत ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गाजत आहेत शीवाय मध्य प्रदेशातील काही भागात गाजली आहेत कवयित्री पज्ञा दया पवार यांचे पण काव्यलेखन महत्वाचे आहे खरंतर दलित कविता ही दलितांच्या जीवनानुभवातून उदयास आली आहे काही कवींनी आपल्या कविता बाबासाहेबांना समर्पित केल्या आहेत तर काही कवी आजही वेगवेगळ्या भावनेतून आंबेडकरांशी हितगुज साधत आहेत. एकोनिशे साठ नंतर वेगवेगळे वाड्मयीन साहित्य प्रवाह उदयास आले त्यातील दलित कविता हा स्वतंत्र वाड्मयीन प्रवाह उदयास आला दलित कविता ही वास्तविकता अनुभवाचे रेखाटन करणारी वेदणांचे उत्कट गीत गात प्रसंगी आक्रमक शब्दशक्तीचा पवित्रा घेऊन सभोवताचं जग हादरुन सोडणारी आहे त्याचे वेगळेपण असे की प्रेम भावना किंवा निसर्ग सृष्टीचे सौंदर्य वर्णन या पेक्षा ही कविता यातनांची गाणी गाते प्रेम आणि धार्मिक भावना यांत गुरफटलेल्या मराठी कवितेपेक्षा वेगळी ठरली आहे यात शंका नाही
श्री. सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं ९५७९५४३३०८

