चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूलदादा आहेर यांच्या माध्यमातून मनमाड बस डेपोमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
४ नोव्हेंबर पासून राज्यात एस. टी . कामगारांचा संप सुरू आहे. गेल्या महिन्याभारतापासून हे कर्मचारी आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना आपले आद्य कर्तव्य आहे की, आपण यांच्या कुटुंबीयांची जान ठेवली पाहिजे.
अशातूनच या कामगारांना पाठिंबा देत मनमाड बस डेपो येथील ७० ते ८० हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा विचार करत व सामाजिक बांधिलकी जपत त्यांना एकहातमदतीचा म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी स्वरूपाने मदत देण्यासाठी चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूल दादा आहेर हे पुढे आले असून, त्यांनी त्यांच्या माध्यमातून मनमाड आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे आम्हीं खंबीर पणे उभे आहोत कर्मचारी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी लढा देत आहे त्यांना आमची गरज भासेल त्या वेळेस आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे आहे असे मत यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले या वेळेस भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गणेश महाले, डॉ.भाऊराव देवरे, डॉ.सुनील सोनवणे, योगेश ढोमसे, पंढरीनाथ खताळ, किरण बोरसे, आत्माराम खताळ, सागर अहिरे, डॉ,सागर कोल्हे आदी च्या उपस्थित जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रवींद्र सांगळे,
दिलीप गांगुर्डे, सुरेश पिठे, शरद गांगुर्डे , राहुल पवार कर्मचारी आदी उपस्थित होते.

