इंडियन डान्स ऑर्गनाइजेशन व क्रीडा संस्कृति फाउंडेशन नाशिक आयोजित १ ली राष्ट्रीय डान्स स्पर्धेचे पारीतोषिक वितरण संपन्न..
नाशिक :-
इंडियन डान्स ऑर्गनाइजेशन व क्रीडा संस्कृति फाउंडेशन नाशिक आयोजित १ ली राष्ट्रीय डान्स स्पर्धा दि. ११/१२/२०२१ रोजी संत जनार्दन स्वामी आश्रम तपोवन येथे पार पडली. कोविड काळात विद्यालय बंद असल्याने स्पर्धा बंद होत्या, त्यामुळे स्पर्धकांना व्यासपीठ व कलागुण सादर करता येत नव्हते. अशातच परीस्थीती नियंत्रित झाल्यामुळे स्पर्धेचे आयोजन होत आहे यामुळे व्यासपीठ उपलब्ध होऊन आपला नृत्य अविष्कार दाखवता येत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आदि राज्यातुन स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी बक्षिसांची लयलुट केली व कोरोना काळातही स्पर्धकांची तयारी नाविन्यपुर्ण होती. यामध्ये बक्षिसार्थी..
1) प्रथम कु. श्रावणी मंगेश राऊत
गुरु गोविंद सिंह पब्लिक स्कूल मोठ गट (लोकनृत्य) प्रथम
2) कु. हर्षिता शशिकांत महाजन
गुरु गोविंद सिंह पब्लिक स्कूल लहान गट पाश्चिमात्य नृत्य प्रथम
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण १२ डिसेंबर रोजी पार पडले. याप्रसंगी मा. अध्यक्ष . डॉ. दिपक भारद्वाज, सरचिटणीस मा. बीरसिंह आर्य, इंडियन डान्स ऑर्गनाइज़ेशन मा. सौ. अस्मिता देशमाने महिला जिल्हाध्यक्ष नाशिक, मा. श्री. अशोक दुधारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ दिपाली गिते, सौ मनीषा काठे, श्री निकम सर यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र संघाला नृत्यदिगदर्शक श्री. धिरज वझरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.गुरू गोबिंद सिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबिरसिंग छाबरा,उपाअध्यक्ष सरदार हरजीतसिंग आनंद,सचिव सरदार कुलजीतसिंग बिरदी , मुख्य कार्यकारी अधिकारी सरदार परमीदूर सिंग ,शाळेच्या प्राचार्या सौ.ज्योथी सामतां , मुख्याध्यापिका सौ.सुनीता प्रसाद ,शिक्षक तसेच सर्व स्तरातुन बक्षीसार्थीचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

