वडनेरभैरव दत्त जन्म उत्सव समितीचा उपक्रम प्रेरणादायी : भाऊसाहेब चौधरी

वडनेर भैरव ( प्रतिनिधी ) वडनेर भैरव चा सार्वजनिक दत्त जन्म उत्सव समिती चा एक पणती कन्येसाठी आणि एक पणती देशासाठी सैनिकांसाठी हा उपक्रम समाजासाठी व देशासाठी बांधिलकी जोपासणारा आहे . सार्वजनिक दत्त उत्सव हा परिसराची ओळख बनत आहे . या धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक उद्बोधन व प्रबोधन करण्याचे काम सलादे बाबा दत्त मंदिर करीत आहे असे गौरव उद्गार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी काढले .
वडनेर भैरव येथील सलादे बाबा दत्त मंदिर येथे साठावा दत्त जयंती उत्सव सलादे बाबा कला क्रीडा मंडळ व वडनेर भैरव सार्वजनिक दत्त उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता दत्त जयंती निमित दत्त यागचे ही आयोजन यजमान अखिल भारतीय हिंदू रक्षक दल चे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी केले होते . सायंकाळी दत्त जन्म उत्सवात नाशिक येथील कृषी उदयोजक गौतम बापू पाटील व अँड पोपटराव पवार यांच्या हस्ते दत्त महाराज पूजा करण्यात आली . यावेळी उत्सव समिती अध्यक्ष एन.डी. दादा माळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक भाऊसाहेब भालेराव ट्रस्ट अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे , कुमारी तेजस्विनी दीपक पवार कुमारी गायत्री दिनकर रसाळ याच्या हस्ते महापूजा आरती करण्यात आली दत्त जन्म झाल्यावर सहयाद्री ग्रुप , शंभूराजे ग्रुप बजरं ग मित्र मंडळ यांनी महा पंगत चे आयोजन केले होते . सलादे बाबा दत्त मंदिर येथे कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे , नाशिक जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष नितीन दादा आहेर , सरपंच सुनील पाचोरकर उप सरपंच योगेश साळुंके चांदवड पंचायत समिती सभापती अमोल भालेराव दिंडोरी लोकसभा युवासेना संपर्क प्रमुख निलेश गवळी नाशिक जिल्हा किसान कांग्रेस चे अध्यक्ष संपतराव वक्ते , चांदवड कृषी बाजार समिती संचालक रावसाहेब भालेराव , सप्तरंगी पतसंस्था मा चेअरमन रामभाऊ भालेराव श्री . बाळासाहेब माळी , डॉ . विक्रम सलादे ,काळुबाबा संस्था संचालक बाबाजी सलादे , प्रमोद माळी , अभिजित भालेराव हे उपस्थित होते .
आपल्या प्रमुख भाषणात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी म्हणाले की , धार्मिक कर्यक्रमा बरोबरच सामाजिक कामे उत्सवातून करण्याची प्रेरणा सलादे बाबा दत्त मंदिर व सलादे बाबा ट्रस्ट च्या माध्यमातून सतत राबवत असते . या मंडळाचा एक पणती कन्येसाठी आणि एक पणती देशासाठी म्हणजेच सैनिक यांच्यासाठी असा उपक्रम हा नक्कीच इतराना प्रेरणादायी आहे असे म्हणाले . दत्त जयतीस गुरुदत्त बाल भजनी मंडळ यांनी दत्त गीत भजन आयोजित केले होते . कार्यक्रम यशस्वितेसाठी साठी दत्तात्रय निखाडे , युवराज सगर , सचिव राहुल पाचोरकर मधुकर पाचोरकर राजमुद्रा गुण , सहयादी ग्रुप शंभू राजे ग्रुप यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज सगर यांनी केले आभार दत्ता शिंदे यांनी मानले तर सूत्र संचालन सुरेश सलादे यांनी केले .दत्त जयंती निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले संयोजक यानी सन्मान चिन्ह देवून कार्यक्रमास मदत करणान्या व्यक्ती व संस्था यांचा सत्कार केला . कार्यक्रमासाठी धोंडगव्हाण शिंदवड पिंपळनारे धोडंबे हट्टी वडाळीभोई शिरवाडे वनी आदी ठिकाणाहून अनेक मान्यवर आलेली होते

