[masterslider id="2"]
अध्यात्मिक लेख विशेष लेख

लोक शिक्षणाचे प्रवर्तक : संत गाडगेबाबा

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

लोक शिक्षणाचे प्रवर्तक गाडगेबाबा यांचा आज पुण्यस्मरण दिन डेबुजी धिंगराज जानोरकर हे त्यांचे मूळ नाव त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी गरीब कुटुंबात झाला तर मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी झाला समाजातील सुधारणावादी संत लोकशिक्षक अशी त्यांची ओळख होती किर्तन हे मनोरंजन नाही तर लोकशिक्षणाचे पवित्र माध्यम मानले जाते आणि स्वच्छता ही आरोग्यासाठी गुरुकिल्ली आहे असे ते किर्तनातून लोकांना उपदेश करीत असत म्हणून सकाळी हातात झाडू घेऊन अख्ख गाव स्वच्छ करून रात्री उशिरापर्यंत किर्तन करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी करुन लोकाच्या मणात साचलेली अंधश्रद्धची घान काढून विनाशकारी कुंठीत बुध्दी ही गतिहिन प्रणालीला जन्म देत असते मात्र विकासासाठी बाधक आहे हे किर्तनातून लोकांना पटवून दिले समाजातील दुःख सारे पदरातून निघून गेले पाहिजे म्हणून कोंबडी,बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा बंद झाली पाहिजे विचाराने अडाणी जीवन जगणं बरं नाही भुकेल्या मानसाला भाकर, तहानलेल्या मानसाला पाणी,आणि तसेच समाजातील व्यसनाधीनतेला विरोध करत पुर्वी अज्ञानी गरीबी, दारिद्र्याने पिळवटून अंधश्रद्धने ग्रासलेल्या मानवी मनाला किर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाने समाजप्रबोधन करीत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या आवडतीच्या भजनाने लोकांचे मनोरंजनही करीत महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक डॉ पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांना आदर्श मानत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे किर्तन आवडीने श्रवण करत समाजातील जातीभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी शिकवण समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आदर्श निर्माण करणारी आहे गाडगे बाबांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९८३ मध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करुन अमरावती येथे १ मे १९८३ रोजी स्थापन झालेल्या नविन विद्यापीठाला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती असे नामकरण केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आजही वेगवेगळ्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील यांनी १ नोव्हेंबर २००४ ते २७ नोव्हेंबर २००८ या उपमुख्यमंत्री पदाच्या कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ह्या योजनेचा शुभारंभ केला, तसेच तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीला आदर्श निर्मल ग्रामपंचायत स्वच्छता पुरस्कार प्रदान करुन स्वच्छतेविषयी संदेश गावागावांत,खेडोपाड्यातवर जनजागृती करीत पोचवला आहे पहिला निर्मल ग्रामपंचायत स्वच्छता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील हिरवे बाजार ग्रामपंचायतीला मिळाला आहे त्याचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावातील गावातील रस्त्यावरुन वाहुन जाणाऱ्या सांडपाण्यासाठी गटारीत सोडले पुर्ण गावच स्वच्छ करीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला त्यांना अनेक पुरस्कार मिळाले २०२१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी गाडगे महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत राळेगण हा परिसर स्वछता अभियानाची जागृती करीत नावारूपाला आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाडगे महाराज यांच्या आदर्शाचे अनुकरण करीत पंतप्रधान झाल्यावर १५ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण भारतवाशीयांना आवाहन केले कि २०१९ मध्ये महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ होईल एक पाऊल स्वछते कडे असा संदेश खेड्यातील भिंतीवर लिहला आहेच पण सध्या चलनात ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोट बंदी नंतर छापलेल्या पैशांच्या नविन नोटा सध्या व्यवहार चालू आहे त्या चलनी नोटांच्या माध्यमातून देखील स्वच्छतेचा संदेश देत मोदींची ही संकल्पना सिध्द झाली आहे आज खेडोपाड्यात खेड्यापाड्यात स्वच्छता गृह बांधली आहेत आज महाराष्ट्राच नाही तर भारत देशातील कितीतरी शहरं स्वच्छ झाली आहेत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ ग्रामिण साहित्यिक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ द ता भोसले यांनी गाडगे बाबांच्या विचारांवर आधारित जीवन चरित्र लिहिले आहे.
गाडगेबाबांच्या पुन्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन..

सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं ९५७९५४३३०८

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या