सोमवार,10 जानेवारी 22 रोजी चांदवड प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात संपन्न होणार ‘सरपंच संवाद’
आज चांदवड प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासमवेत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद व ‘नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने
उत्तर महाराष्ट्रातील 54 तालुक्यात ‘सरपंच संवाद’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

‘सरपंच संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात करण्यासाठी आज (शुक्रवार,दि.24 डिसेंबर 21) रोजी चांदवडचे प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या समवेत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली.
चांदवडचे प्रांत मा.श्री.चंद्रशेखर देशमुख,तहसीलदार मा.श्री.प्रदीप पाटील यांच्याशी फोनवर तर चांदवडचे गटविकास अधिकारी मा.श्री.महेश पाटील यांना प्रत्यक्ष भेटून ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले,नाशिक विभागाचे समन्वयक श्री.संजय भांबर, चांदवड तालुका समन्वयक श्री.विजय जाधव,चांदवड तालुका संघटक व चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती श्री. अनिल काळे,मंगरूळ गण समन्वयक श्री.डॉ.दिलीप शिंदे,मंगरूळ गण संघटक श्री.परशराम निकम, धोडांबे गण संघटक श्री.संजय महाराज शिंदे, वडाळीभोई गण संघटक श्री.शंकरराव जाधव,वाहेगाव गण समन्वयक श्री.संदीप शिंदे, वाहेगाव गण संघटक श्री.पिंटू भोईटे,दुगाव गण समन्वयक श्री.भाऊसाहेब शेलार व भरविरचे सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय धाकराव यांनी चर्चा केली.
सोमवार,10 जानेवारी 22 रोजी चांदवड प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ‘सरपंच संवाद’ हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धपणे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे संस्थापक श्री.राहुलजी कराड यांच्या विचार चिंतनातून ‘सरपंच संवाद’ ही उपक्रम संकल्पना साकारली असून नाशिक विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्णजी गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
नाशिक विभाग महसूल प्रबोधिनीचे निबंधक उपजिल्हाधिकारी श्री.अरुणजी आनंदकर हे आयोजन मार्गदर्शक आहेत.
शुक्रवार,26 नोव्हेंबर 21 रोजी ‘नाशिक विभागीय आयुक्त विभागा’च्या नाशिकरोड येथील ‘नियोजन सभागृहा’त ‘सरपंच संवाद’ उपक्रमाचा प्रारंभ नाशिक विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्णजी गमे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
‘सरपंच संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त विभागातील ‘अ’ श्रेणी महसूल अधिकारी तालुक्यातील सर्व सरपंचांना प्रत्यक्ष भेटतील, महाराष्ट्र महसूल विभागाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील गावातील ज्वलंत महसूल सममस्यांचे निवेदन स्वीकारून त्या समस्यांचे समाधानकारक निराकरण करतील.
सरपंच आणि शासन यांच्यात अभ्यासपूर्वक समस्या निराकरण करणारा संवाद घडवून आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उददेश आहे.

