[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अ. भा. योगशिक्षक महासंघाच्या ‘महायोगोत्सवात जलनेती अभियान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नाशिक:- अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन ‘महायोगोत्सव’ वेरूळ (औरंगाबाद) येथे २५,२६ डिसेंबरला नुकतेच संपन्न झाले या योग महोत्सवात योग विषयावर विविध व्याख्याने, योगनृत्य, व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. असून चांदवड येथील अखिल भारतीय शिक्षक महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सचिव प्रा. राहुल (अंबादास) भिला येवला (इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नाशिक जिल्हा उपाध्यक्ष) यांचे श्वसन व संसर्गजन्य विकारांवर जलनेती व ओंकार साधनेचा परिणाम व महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आय.एन.ओ. अंतर्गत प्राकृतिक चिकित्सा दिवस निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष १००८ स्वामी शिवानंदन महाराज यांच्या सहकार्याने जलनेती अभियाना विषयी सविस्तर माहिती दिली.


महायोगोत्सव कार्यक्रमात जलनेतीवर मार्गदर्शन करताना प्रा. राहुल (अंबादास) येवला,व्यासपीठवार आश्रम प्रमुख शांतिगिरी महाराज, रामानंद महाराज डॉ. मनोज निलपवार, डॉ. तस्मिना शेख,योगाचार्य अशोक पाटील, प्रा. उत्तमराव अहिरे , प्रा. जीवराम गावले, प्रा. प्रसाद कुलकर्णी प्रा. किशोर भंडारी आदी मान्यवर

तसेच डॉ. तस्मिना शेख (आय.एन.ओ., उत्तर महाराष्ट्र,जॉईंट सेक्रेटरी ) यांनी जलनेती चे महत्व विषद केले असून योगशिक्षक अशोक पाटील, किशोर भंडारी यांनी जलनेती क्रियांचे प्रात्यक्षिक दिले. यात उपस्थित योगशिक्षक व साधकांना तिनशेहुन अधिक जलनेती पात्रांचे मोफत वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष प्रा. यु. के. अहिरे, महासचिव वैशाली उपाध्यक्ष जीवराम गावले, उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, योगशिक्षक सीमा क्षिरसागर, दिपाली खोडदे ,गीता कुलकर्णी, शर्मिला डोंगरे, सुहास खाडीलकर, मीनाक्षी भावसार, विठ्ठल पवार, किर्ती मांदळे, अनिता भिंगारकर,सोपान सोमवंशी, मंदार भागवत, इसाक शेख, आदींचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमात जगतगुरु संत जनार्धन स्वामी (मौनगिरीजी महाराज) यांच्या वेरूळ येथील आश्रमाचे उत्तराधिकारी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, डॉ. मनोज निलपवार, आश्रम प्रमुख रामानंद महाराज, योगासन फेडरेशनचे राज्य सचिव सुरेश गांधी वाय. सी.एम.यु. नाशिकचे आरोग्य विभागाचे डायरेक्टर डॉ. जयदीप निकम आदी मान्यवरांनी जलनेती अभियानाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या