आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी मोह फुलांचा सुगंध…
वनस्पती सृष्टी मध्ये मोहाच्या झाडाला आदिवासी भागांत कल्पवृक्ष म्हणतात. ही मोहाची झाड आदिवासी बांधवांना आर्थिक उदरनिर्वाहासाठी दिलासा देणारी ठरली आहेत अगदी निसर्गाच्या सान्निध्यात बदलत्या उप ऋतूचक्रात वेगवेगळ्या जीवनमुल्यांची साक्ष देत मानवी सृष्टी बरोबरच निसर्गाच्या सान्निध्यात वावरणाऱ्या जीवाणूंना साथ देतात साधारण हिवाळ्यातील दिवस सरल्यानंतर शीशीर ऋतूमध्ये झाडांच्या पानगळतीला सुरुवात झाली की मोहाची झाडंही पुर्ण पानं खकरून मोकळे
होतात आणि वसंत ऋतूत जानेवारी महिन्यापासून कळ्यांनी बहरायला सुरवात होते आणि पुढे होळी ( शिमगा) सणाच्या आधी मोह फुलांचा बहर भरुन येतो साधारण वातावरणातील १३ ते १६ डिग्री सेल्सिअस तापमानात ही मोहफुलं मोठ्या प्रमाणात झाडांच्या पाकळीतून गळून पडतात आदिवासी भागातील लोकांची परिस्थिती ही गरीबीची, बेताचीच असल्याने शीवाय या भागात दरीखोरीत पडिक माळरानावर मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने अगदी पहाटी पासून ते मोहाच्या झाडाखाली जाऊन बसतात, झाडांच्या खोडापासूनचा परीसर पानट झाडुन घेऊन ती जागा मोकळी करून घेतात जेणेकरून मोहाची फुले वेचायला सोपं असतं मोहाची फुलं वेचून उन्हाळ्यात वाळवुन बाजारात विकल्यावर दोन पैसे येतील आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो याच दरम्यान निसर्गाच्या सान्निध्यातिल वेगवेगळे प्राणी,पक्षी झाडावरून खाली वर प्रवेश करताना आढळून येतात कावळा, होला, भारद्वाज, कोकिळ ह्या पक्ष्यांची गर्दीच होते रानमांजर हा प्राणी आज दुर्मिळ होत चालला आहे परंतु आदिवासी भागात मोह फुलांचा बहर भरुन आला की मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी मोहाच्या झाडावर चढून मोहाची फुलं खाऊन बऱ्याच वेळा फांदीवर, खोडावर उलटी केलेली आढळते त्याला आदिवासी भागात मोहोट या शब्दाने संबोधले जाते त्याची शरीर रचना गावठी मांजरा प्रमाणेच परंतु शेपटी लांब असते शरीर निमुळते असते. मोहाची फुलं संपल्यानंतर हे झाड पुर्णपणे हिरव्या रंगाच्या पानांनी भरुन जाते पुढे मोहटोळंबी येते त्याची बी काढून टाकल्यानंतर भाजी बनवली जाते
तीच फळं पुर्ण पिकली की बी काढून उन्हाळ्यात वाळू घालून तेल गाळतात ते आयुर्वेदिक तेल मानले जाते मोहाच्या फुलांपासून दारु गाळतात अगदी जन्म, विवाह,उत्तरविधी पर्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आदिवासी भागात श्रध्दाळू,दैवभोळेपणा अंगीकारलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत मोहाच्या झाडांचा पालापाचोळा हा शेती व्यवसाय करण्यासाठी उन्हाळ्यात जाळुन भूज तयार करून ती रोप वाढीसाठी आवश्यक असते मोहाची झाडे ही आदिवासी भागातील लोकांना वरदानच ठरली आहेत.
सुभाष नारायण कामडी
संशोधक,
मो नं ९५७९५४३३०८

