चांदवड- सोनीमराठीवर सुरू असलेल्या इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमातील टॉप १० मधील सिन्नर येथील प्रसिद्ध सिने पार्श्वगायक व संगीतकार ऋषिकेश शेलार यांनी चांदवड येथे भेट दिली.
यावेळी त्यांचा के.के.ट्रेडींग कंपनीचे संचालक कैलास कोतवाल,पत्रकार नितीन फंगाळ, योगेश अजमेरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऋषिकेश शेलार यांनी चित्रपटांना पार्श्वगायन केले असून त्यांचा ‘पाऊस गाताना’ हा मराठी गीतांचा अल्बम प्रसिद्ध आहे.
याप्रसंगी बासरी वादक अनिकेत शेलार,दिलीप देवरे,निलेश पवार,विष्णू थोरे, राहुल कोतवाल आदी उपस्थित होते.

