पंचायत समिती चांदवड यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भुमिपुजन शुभारंभ सोहळा रविवारी मेसनखेडे गणातील गावांमध्ये ठिकठिकाणी पार पडला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड व पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यांना निधीची कमतरता असतांनाही मेसनखेडे गणातील प्रत्येक गावात गणाचे सदस्य शिवाजी सोनवणे यांनी वित्त आयोगाच्या निधीतून काही ना काही कामे दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या निधीतून कानडगाव येथे स्वच्छता गृह बांधकाम (२ लक्ष रुपये) कुंदलगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (१ लक्ष रुपये)
दहेगाव येथे पाण्याची टाकी बांधणे(१लक्ष २०हजार रुपये )
डोणगाव येथे आरो प्लॉन्ट बसविणे ( ३लक्ष रूपये) पेव्हर ब्लॉक बसविणे ( २ लक्ष रूपये ) स्वच्छता गृह बांधणे (२ लक्ष रुपये) अंगणवाडी सौरपथ दिप बसविणे ( १ लक्ष रूपये )
निमोण येथे
पाण्याची टाकी बांधणे (१लाख २० हजार रूपये ) हॅन्डवॉश स्टेशन बांधणे ( २ लक्ष रुपये )
दरेगाव येथे पाण्याची टाकी बांधणे( १लाख २० हजार रुपये )पाण्याची टाकी बांधणे( १लाख६६हजार रुपये )
मेसनखेडे खुर्द येथे पेव्हर ब्लॉक बसविणे( २ लक्ष रुपये)
शिंगवे येथे पाण्याची टाकी बांधणे (१ लाख २० हजार रुपये)
कोकणखेडे , कानडगाव , शिंगवे दरेगाव निमोण,डोणगांव येथे सौर पथदिवे बसविणे ( २लाख३०हजार रुपये) या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी मेसनखेडे खुर्द गणातील विविध गावांमध्ये त्या त्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्य पक्ष पदाधिकारीव ग्रामस्थ मित्र मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी
डोणगांव सरपंच जगदीश शेळके निवृत्ती शेळके ,खंडु माळी, कानडगांव येथे माजी उपसरपंच विजय पहिलवान,निमोण येथे संदिप देवरे कैलास देवरे बाळू उगले बाळू बोरसे भगवंत राव बाराहाते पंकज दखणे व इतर मान्यवर उपस्थित होते
शिंगवे चे संरपच शरद पाटील संजय खताळ राजाभाऊ ठोंबरे संजय आहीरे भाऊसाहेब गोसावी रवींद्र जेजुरे अर्जुन शेळके राजेंद्र जेजुरे रावसाहेब सोनवणे छोटु दसपुते दहेगाव संरपच कलवर कानडगाव चे सरपंच पवार उपसरपंच बापु लांडे जगन्नाथ खेमनार निमोण संरपच खंडु माळी कुंदलगाव संरपच दयानंद आहीरे अशोक पिंपळे; पगारे दरेगाव येथे संरपच अमोल देवरे,सोसायटी चेअरमन विक्रम देवरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मेसनखेडे गणप्रमुख रावसाहेब देवरे,सहगणप्रमुख दत्तु पगार,बाबाजी देवरे डोणगांव येथे सुभाष वाघ शिवाजी वा़घ विक्रम वाघ यशवंत शेळके बाळू मावळे निवृत्ती शेळके सुभाष शेळके अशोक कडनोर आदी उपस्थित होते. या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी कोरोना काळात डॉक्टरांनी सेविकांनी चांगल्या प्रकारे केले त्याबद्दल पंचायत समिती चांदवड च्या वतीने कोरोना सन्मान पत्रक वाटप डॉक्टर सयाजीराव गायकवाड जिल्हा परिषद उपाध्यक्ष व पंचायत समिती चांदवड उपसभापती श्री शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आले .डॉक्टर बोरसे आशा सेविकांचा सर्टफिकेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

