[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे शिवजयंतीनिमित्त शिवसप्ताह सांगता समारोह

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगांव रेपाळ (वार्ताहर) :-जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे शिवसप्ताह मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्त विद्यार्थ्यांच्या रांगोळी,सुंदर हस्ताक्षर,निबंध,चित्रकला व वक्तृत्व आणि शिवरायांच्या जीवनावर गीतगायन स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिवजयंती निमित्त भव्य वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी कोणी शिवराय,कोणी सरदार,कोणी मावळे तर मुलींपैकी कोणी राजमाता जिजाऊ तर कोणी हिरकणी बनून आल्या होत्या. जि.प.शाळेत शिवजयंतीनिमित्त गावचे प्रथम नागरिक सरपंच तुकाराम गुंजाळ, उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण यादवराव निकम,गोरखभाऊ जगताप,माजी सरपंच नारायण गुंजाळ,शा.व्य.समिती सदस्य,ज्ञानेश्वर तनपुरे,श्रीराम बागुल,तसेच बाबासाहेब कचू निकम,संतोषकुमार निकम,बाबासाहेब पोपट निकम,अंगणवाडी सेविका मिराताई तनपुरे,मुख्याध्यापक शिवाजी आहेर,सहशिक्षक सुरज झाल्टे,विकास कदम,संदीप चव्हाण,राहुल चौधरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरज झाल्टे यांनी केले,विकास कदम यांनी आभार मानले.

 

 

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या