
युवक देशाचा खरा कणा आहे, कॉंग्रेस नेतृत्वावर देशाचा पुन्हा विश्वास बसत असल्याने आम्हाला कॉंग्रेसपक्षाठी काम करायची संधी मिळत आहे. इतर पक्षातील विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत असून, आमच्यात कुठलीही गटबाजी अथवा संघटनेत अंतर्गत वाद नाही. हि निवडणूक अत्यंत खेळीमेळीची झाली असून यात विजय पराजय असं आम्ही समजत नाही. संघटनात्मक काम करताना कुणी बंडखोरी करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. प्रदेशाध्यक्ष कुणाल राउत, गौरव पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष मानस पगार अशा दिग्गजांसोबत काम करायची संधी मिळत असल्याने आमचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.
– दिपांशु अरुण जाधव, (तालुकाध्यक्ष) युवक कॉंग्रेस चांदवड देवळा मतदारसंघ
कॉंग्रेस पक्षाचे राज्यभरात नेतृत्व बदल होतांना दिसत आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत राज्यभरात तरुण तरुणींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक मतदार संघातील तरुणांना जोडून घेण्याच्या य अभियानातून व लोकशाही पद्धतीने हि निवडणूक पार पडली.
चांदवड-देवळा मतदार संघातील युवक कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदासाठी जोपूळ येथील श्री दिपांशु अरुण जाधव व महिंद्रा शिंदे तर देवळा तालुक्यातुन निखिल आहेर असे तिन उमेदवार शर्यतीत होते. महिंद्रा शिंदे यांना ७६९ तर निखिल आहेर यांना अवघे १९६ मिळवता आली तर श्री दिपांशु अरुण जाधव यांनी तब्बल २१०४ मते मिळवत दोन्हीही प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला.
‘कमी मताधिक्य मिळाले म्हणून दोन्ही उमेदवारांनी खचून न जाता, त्यांना उपाध्यक्ष व सरचिटणीस पदांवर संधी दिली जात आहे. युवक कॉंग्रेससोबत जोडले गेलेल्या तरुणांचे यानिमित्ताने संघटन मजबूत करावे’ असे आवाहन तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी केले.
निकाल जाहिर झाल्यानंतर दिपांशु जाधव समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची उधळण करत विजयाचा जल्लोष करत सोशल मिडियावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दिपांशु जाधव यांच्या विजयाने चांदवड तालुका युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यामधे नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे.
नवनिर्वाचित युवक कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष दिपांशु जाधव, उपाध्यक्ष महेंद्र शिंदे, तसेच सरचिटणीस निखील आहेर यांनी तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करावे असे आवाहन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केले.
या निवडी बाबाद माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल , तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री संजय दगुजी जाधव, जिल्हा सरचिटणीस शिवाजी कासव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, भीमराव जेजुरे, विजय कुंभार्डे, बापूसाहेब शिंदे तसेच युवक कॉंग्रेसचे राहुल कोतवाल, अनिल कोतवाल, अमित मधुकर जाधव, बापूसाहेब जाधव, अमोल जोरे, पप्पू कोतवाल, कैलास सावकार, तेजस नवले, मयूर देवरे, महेंद्र गांगुर्डे, अमोल पिंपरकर, पंकज जाधव, निलेश जाधव, सागर निकम तसेच अनेक मान्यवरांनी विजयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी उपस्थित असणारे युवक कॉंग्रेसचे अक्षय माकुने पाटील व किरण ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले

