[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

हरसुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

हरसुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . , हरसुल ता . चांदवड जि . नाशिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. त्या त्या मतदारसंघात माघारीच्या विहित मुदतीनंतर , ते एकटाच उमेदवार होते .ईतर मागास प्रतिनिधी मतदारसंघात माजी सरपंच आहेर शरद केदु यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सर्वसाधारण मतदारसंघात , खैरे अंबादास लक्ष्मण, खेरे दिपक बाजीराव ,खैरे विजय दशरथ, खैरे साहेबराव निवृत्ती, खैरे सोमनाथ काशिनाथ, खैरे संजय भागुजी, रौंदळे वामन भिका, खैरे अशोक सावळीराम तर
महिला प्रतिनिधी मतदारसंघात बच्छाव धोंडयाबाई महादु व रौंदळे भामाबाई मोतीराम ,या महिलांना संधी मिळाली आहे तर
भटक्या जाती/ वि.मा.प. हे पद रिक्त राहिले आहे. तर अनु.जाती/ जमाती या गटात वानखेडे मच्छिंद्र आनंदा ,हे बिनविरोध निवडून आले आहे.
ज्योती भरत घडोजे ,निवडणूक निर्णय अधिकारी हरसुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . , तथा लेखापरिक्षक , सहकारी संस्था , चांदवड यांनी निवडणुकीसाठी कामकाज पाहिले.
दरम्यान सुरु सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याने आता यापुढील चेअरमन व व्हा.चेअरमन निवडणूकीसाठी आता माजी सरपंच शरद आहेर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Sending
User Review
4.67 (3 votes)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या