चांदवड पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य उपजिल्हाप्रमुख शिवसेना नितीन आहेर यांनी त्यांच्या पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून वडाळीभोई गणातील सर्व शाळांना व्हाइट बोर्ड पुरवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची खडूच्या धुळी पासून सुटका केली आहे या उपक्रमाचे उद्घाटन दिनांक २५/०३/२०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी भोई येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती कारभारी आहेर, वडाळीभोई चे सरपंच चंदूदादा त्याचप्रमाणे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संदीप कुमार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वर्षापासून ठाकरे सरकारच्या माध्यमातून 15 वा वित्त आयोगाचा निधी हा पंचायत समिती सदस्यांना वितरित करण्यात आला वेगवेगळ्या सदस्यांनी आपल्या गणातील गावांमध्ये वेगवेगळे विकास कामे प्रस्तावित केली मात्र नितीन दादांनी प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी या बाबीचा फायदा व्हावा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या गणातील सर्व शाळांना आधुनिक युगातील व्हाईट बोर्ड मिळवून देऊन एक नवा आदर्श पायंडा पाडलेला आहे ही बाब शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आनंदाची ठरत आहे. खडू मध्ये असलेल्या धुलीकणांमुळे अनेक शिक्षकांना व विद्यार्थ्यांना श्वसन विकार जडतात. वर्ग देखील खराब होत असतात त्यामुळे व्हाईट बोर्ड चा वापर हा वैज्ञानिक दृष्ट्या देखील योग्य ठरत असतो.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर जाधव विनता पतसंस्थेचे चेअरमन वसंत आहेर व्हाइस चेअरमन शरद जाधव व्यापारी असोसिएशनचे शहर अध्यक्ष पिंटू शेठ संचेती, प्रदीप आहेर ,राहुल संचेती ,विकास आहेर संतोष जाधव, अरुण आहेर, राजा बाबा, किरण आहेर ,भाऊसाहेब धाकराव,व शिवसैनिक तसेच वडाळीभोई केंद्राचे शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य प्रभारी केंद्रप्रमुख सोमनाथ पवार श्री भदाने सर आहेर,सर पवार सर ,बारहाते सर ,लोखंडे सर, दादा पाटील सर सौ जाधव मॅडम, आहेर मॅडम, पगार मॅडम मॅडम, सोनवणे सर वडाळीभोई केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
वडाळीभोई केंद्रातील एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वडाळीभोई शिवसेना शहर शाखा घेईल असे शहरप्रमुख ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक सेना सरचिटणीस श्री सतीश पाटील सर यांनी केले.

