‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद’ आणि
‘महाराष्ट्र शासन – नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील एकूण 54 तालुक्यात ‘ग्रामसंसद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशाकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष श्री.राहुलजी कराड
नाशिक विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्णजी गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
‘नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी’चे संचालक उपजिल्हाधिकारी श्री.अरुणजी आनंदकर हे संयोजन मार्गदर्शक आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात 7 एप्रिल 22 रोजी ‘चांदवड तालुका – सरपंच संसदे’चे’आयोजन करण्यात येत आहे.
चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे.
‘सरपंच संसदे’त मालेगाव अपर जिल्हाधिकारी,चांदवड उपविभागीय अधिकारी (प्रांत), चांदवड तहसीलदार व चांदवड गटविकास अधिकारी सरपंचांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
कार्यक्रमाच्या अचूक नियोजनासाठी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील,
सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले,नाशिक विभाग समन्वयक श्री.संजय भांबर,चांदवड तालुका समन्वयक श्री.विजय जाधव व तालुका संघटक श्री.अनिल काळे यांनी आज (मंगळवार,22 मार्च 22) चांदवडचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) श्री.चंद्रशेखर देशमुख व तालुक्याचे तहसीलदार श्री.प्रदीप पाटील यांची भेट घेतली व सविस्तर नियोजन केले.
ज्येष्ठ नेते व दरसवाडीचे सरपंच श्री.आर.डी. थोरात,’एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे चांदवड तालुक्यातील गणसमन्वयक देवरगावचे श्री.डॉ.दिलीप शिंदे, शेलुचे श्री.शंकर जाधव,गोहरणचे श्री.पवनकुमार जाधव, कानडगावचे श्री.विजयराव गांगुर्डे,भोयेगावचे श्री.उत्तमराव ठोंबरे,परसुलचे श्री.परशराम निकम,भरविरचे श्री.रवींद्र जाधव, कानडगावचे श्री.विजय पवार,भायाळ्याचे श्री.शरद शिंदे,गोहरणचे श्री.साहेबराव जाधव, तसेच शेलुचे श्री.विश्वनाथ जाधव,श्री.बापू जाधव,श्री.राजेंद्र जाधव व पुरीचे श्री.नितीन पानसरे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चांदवड तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘सरपंच संसद’ चांदवड प्रांत कार्यालयाच्या सभागृहात चांदवड येथे संपन्न होणार आहे.

