[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रासायनिक खते खरेदी करण्याचे तालुका कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन – युद्धाच्या पार्श्वभूमीवर खतांचे दर वाढण्याची व टंचाईची शक्यता

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

रशिया युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांच्या कींमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे तसेच खते टंचाईची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खते खरेदी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.

भारत देश रासायनिक खतांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही.आपल्याला अनेक रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते.तालुक्यात मका,सोयाबीन,कांदा या प्रमुख पिकांचे पेरणी क्षेत्र असून या पिकांना खतांची आवश्यकता जास्त असते.दरवर्षी पेरणीनंतर खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची प्रचंड मागणी वाढते.परंतु यावर्षी रशिया युक्रेन युद्धामुळे रासायनिक खत आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे,तसेच रासायनिक खतांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत तालुक्यातील खत विक्रेत्यांकडे खतांचा साठा शिल्लक आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासुनच खतांचे नियोजन करून खते खरेदी करण्याचे आवाहन विलास सोनवणे यांनी केले आहे.

Sending
User Review
5 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या