[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगाव रेपाळ (वार्ताहर):- येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच तुकाराम गुंजाळ यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण यादवराव निकम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, ग्रामपंचायत सदस्य गोरख जगताप,तसेच भास्कर गुंजाळ, समाधान बढे,नवनाथ पगारे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आठवणी सांगितल्या.बाबासाहेबांवर कविता व गीते सादर केली.शिक्षकांमधून विकास कदम ,सुरज झाल्टे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मनोगत मांडले.मुख्याध्यापक शिवाजी आहेर ,संदीप चव्हाण,राहुल चौधरी आदी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरज झाल्टे यांनी केले,विकास कदम यांनी आभार मानले.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या