चांदवड – देवळा मतदारसंघात कृषी धोरण २०२० योजने मध्ये नवीन ३३/११ केव्ही , तिसगाव , खंडाळवाडी ( वडनेरभैरव ) व कुंभार्डे उपकेंद्राना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल दादा आहेर यांनी दिली.
यामध्ये तिसगाव उपकेंद्र येथे ( २ * ५ MVA ) , खंडाळवाडी ( वडनेरभैरव ) येथे ( १ * ५ MVA ) , तसेच कुंभार्डे येथे ( १ * ५ MVA ) , क्षमता असलेल्या नवीन उपकेंद्रांना ( सबस्टेशन ) मंजुरी मिळाली असून सदर उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर येथून निघणा – या नवीन ११ केव्ही वाहिन्यांमुळे ३३/११ चांदवड उपकेंद्र , ३३/११ वडनेरभैरव उपकेंद्र , व ३३/११ उमराणे उपकेंद्र यांच्या वरील असलेला अतिभार ( ओव्हरलोडिंग प्रोब्लेम ) कमी होवून परिसरातील गावांना या नवीन उपकेंद्रांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून यामुळे शेतकरी वर्गाला शेतीसाठी व विजग्राहाकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ . राहुल आहेर यांनी दिली .

