शिंगवे मेसनखेडे सोसायटीत गुरुदत्त पँनलने सर्वच सर्व दहा जागा जिंकूनही गुलाल ,फटाक्यांना फाटा देत नाही केला आनंदोत्सव साजरा. राजकीय सामंजस्याचे दर्शन !!
चांदवड तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील शिंगवे मेसनखेडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.या संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. तीन जागा बिनविरोध निवड करण्यात आल्या होत्या. तर उर्वरित दहा जांगांसाठी निवडणूक पार पडली. या सर्व दहा जागांवर विजय मिळवत गुरुदत्त विकास पँनलने बाजी मारली व स्पष्ट बहुमत मिळविले. निवडणूक निकालानंतर गुरुदत्त विकास पँनलच्या उमेदवारांनी मात्र कोणताही जल्लोष साजरा केला नाही.एकीकडे काही ठिकाणी संपूर्ण गावानं थांबत गावात राजकीय वैमनस्य नको म्हणून बिनविरोध निवडणूक केली असतांनाही विजयी झाल्याच्या थाटामाटात फटाके, गुलाल उधळण करत व वाद्यांचा तालावर नाचत आनंदोत्सव साजरा करतांनाचे चित्र पाहावयास मिळत असतांनाच येथील पँनलने निवडणुकीत विजय मिळवूनही प्रतिस्पर्धी पँनलचे उमेदवार हे आपल्याच गावातील आहेत,काही आपल्याच नात्यातली आहेत. व गावात सामाजिक व राजकीय शांतता व सौदार्य राहावे या उदात्त भावनेने विजयाच्या आनंदाला मुरड घालत साधेपणाने शुभेच्छा देत ना गुलाल,ना फटाके ,ना मिरवणुकीसाठी डि.जे.या सर्वांना फाटा देत इतर ठिकाणच्या गावांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या या मोठेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजकीय मतभेद वैयक्तिक पातळीवर नेणाऱ्या गावपातळीवरील राजकारणापुढे शिंगवे मेसनखेडे येथील ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.




शिंगवे मेसनखेडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.
सर्वसाधारण कर्जदार गटात कडनोर सखाराम देवचंद ( 229),कलवर लक्ष्मण नारायण( 229) ,ठोंबरे अंबादास पुंडलिक( 324 ) , ठोंबरे राजेंद्र वाळुबा (322 ) ,ठोंबरे साहेबराव परशराम (318 ) , थोरात शंकर सखाराम ( 317) , मार्कड किसन सखाराम (312), मार्कड विक्रम भागवत ( 366) हे उमेदवार निवडून आले. एन. टी.गटात बिडगर गंगाधर तात्याबा हे विजयी झाले आहे. तर अनुसूचित जाती-जमाती गटात पगारे श्रावण किसन( भाई ) यांनी विजयश्री मिळवली. तर तीन जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यात महिला प्रतिनिधी म्हणून गं.भा.आसराबाई सिताराम थोरात व गं.भा रंजनाबाई बाळु ठोंबरे तर ओ.बी.सी.प्रवर्गात संतोष लक्ष्मण पवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.चांदवड बाजार समितीचे माजी सभापती विक्रमबाबा मार्कंड यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे.

