सोनी सांगवी विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदासाठी रंजन पुंजाराम ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सूचक म्हणून त्रंबक दत्तू ठाकरे तर अंबादास पर्बत ठाकरे अनुमोदक होते व व्हाईस चेअरमन पदासाठी शैलेश गंगाधर ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना बबन ठकाजी ठाकरे सूचक तर उत्तम विष्णू ठाकरे अनुमोदक होते. नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुनील आढाव यांनी निवडणूक बिनविरोध पार पडली असे जाहीर केले याप्रसंगी संचालक सर्वश्री विजय बनकर, सविता तुकाराम ठाकरे, संजय नानाभाऊ ठाकरे, बबन विष्णू ठाकरे संस्थेचे सचिव राजेंद्र भागवत सोनवणे आदी उपस्थित होते.

